spot_img
अहमदनगरसंदीप कोतकर यांचा कार्यकर्त्यांशी संवाद; 'एका जत्रेने देव म्हातारा होत नाही', तुम्ही...

संदीप कोतकर यांचा कार्यकर्त्यांशी संवाद; ‘एका जत्रेने देव म्हातारा होत नाही’, तुम्ही तर खोट्या गुन्ह्यात..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
मी आमदार होऊ नये म्हणुन 2009 मध्ये मला एका गुन्ह्यात अडकवण्यात आले. तो माझ्या नशिबाचा भाग आहे. पण याचा परिणाम नगर शहराच्या विकासावर झाला. लोकांना ठरवु द्या कोण कामाचा आहे, तुम्ही तर खोट्या गुन्ह्यात अडकवुन तो ही अधिकार हिरावुन घेत आहात. तांत्रिक बाबी तपासुन एक-दोन दिवसात निवडणुकीचा निर्णय घेईल असे स्पष्ट मत माजी महापौर संदिप कोतकर यांनी व्यक्त केले.

गुरूवारी रात्री उशिरा माजी महापौर संदिप कोतकर तब्बल 12 वर्षानंतर केडगावातील आपल्या निवासस्थानी आले. त्यानंतर उपस्थीत समर्थकांसमोर त्यांनी आपल्या मनातील भावना मोकळ्या केल्या. केडगाव देवी ते निवास्थानापर्यंत संदीप कोतकर यांची रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी ते म्हणाले की, बारा वर्षांपुर्विच मी आमदारकीची तयारी सुरू केली होती. मात्र मी आमदार होऊ नये म्हणुन मला गुन्ह्यात अडकविण्यात आले. याचा परिणाम केडगावसह नगर शहराच्या विकासावर झाला.

मला माझ्या कुंटुबापासून दुर ठेवण्यात आले. तो माझ्या नशिबाचा भाग म्हणुन मी स्विकारले आहे. पण आता निवडणूक लढवायची असल्याने चार – पाच महिन्यांपासून प्रयत्न करीत आहे. मात्र मी निवडणुकीत उभा राहू नये म्हणुन जाणिवपूर्वक माझ्या समोर अडचणी निर्माण केल्या जात आहेत. नगर शहराचा विकास कोण करू शकतो हे लोकांना ठरवु द्या, पण तो ही अधिकार दिला जात नाही असे कोतकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, नगर शहराच्या गेल्या दहा वर्षांच्या विकासावर स्पष्ट बोलणार आहे. विकास का थांबला याचा उलगडा व्हायला हवा. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी काही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यातुन मार्ग काढुन एक दोन दिवसात याबाबत स्पष्ट निर्णय घेतला जाईल.

एका जत्रेने देव म्हतारा होत नाही
यावेळी संदिप कोतकर म्हणाले की, पूव आम्ही बेसावध होतो म्हणुन आम्हाला अडकविण्यात आले. पण आता आम्ही सावध झालो आहोत. मी आमदार होऊ नये म्हणुन माझ्या समोर अडचणींचा डोंगर उभा केला जात आहे, पण हे लक्षात ठेवा एका जत्रेने देव म्हातारा होत नाही. जे झाले ते झाले आता पुढे असे होणार नाही.

गुंडगिरी असती तर केडगाव वाढले असते का
केडगावात आम्ही गुंडगिरी करतो, दहशत करतो असा आरोप केला जातो पण केडगावात आमची गुंडगिरी असती, आम्ही सर्वसामान्य लोकांना त्रास देत असतो तर केडगावचा मोठा विस्तार झाला असता का असा सवाल करून संदिप कोतकर म्हणाले की केडगावकरांना वाऱ्यावर सोडणार नाही. मी महापौर असतांना जी कामे केली ती कामे आजही चांगली आहेत. परंतु, दहा वर्षात शहरात व उपनगरांत कोणाता विकास झाला हे पहावे लागणार आहे. केडगावची पाणी योजना केली. त्या योजनेतून केडगावकरांना दररोज पाणी मिळणे अपेक्षित होते. परंतु आजही केडगावकरांना चार-पाच दिवसाला पाणी मिळतेय. केडगावकरांना दररोज पाणी मिळण्याचे स्वप्न मि पाहिलेय, शहर विकासाचे स्वप्न पाहिलेय ते पूर्ण करण्यासाठी मी वचन बद्ध आहे.

अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली; सचिन कोतकर
माजी महापौर निवास्थानी आगमन झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. उपस्थितांना पाहून त्यांना गहिवरुन आले. संदीप कोतकर यांनी संवाद साधल्यानंतर समर्थकांनी आग्रह केल्याने यावेळी सचिन कोतकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, कोतकर नगर शहरातुन निवडणूक लढवण्याच्या चर्चेने नगरमध्ये अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. नियतीच्या फेऱ्यातुन आमची गाडी आता बाहेर येत आहे. आमच्यामुळेच नगर शहराची जागा जाहिर होण्यास उशीर लागत आहे. येत्या दोन दिवसांत माजी महापौर संदीप कोतकर योग्य तो निर्णय घेतील असे सांगितले. तसेच शेवटी राम कृष्ण हरी म्हटल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राधाकृष्ण विखे पाटलांची संपत्ती किती? पहा सविस्तर…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री -  महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आठव्यांदा आपला...

मतदारसंघाच्या विकासासाठी विधानसभा लढवणार: सागर बेग

श्रीरामपूर | नगर सह्याद्री:- श्रीरामपूर मतदारसंघ कायम हिंदुत्ववादी उमेदवाराच्या हातातून गेलेला आहे. त्याची कारणे देखील...

करन्सीच्या सौद्याने नागवडे फेकले गेले बॅकफूटवर

138 कोटींवर पाणी फेरणाऱ्या राहुल जगतापांच्या पदरी काय? उमेदवारीच्या आदलाबदलीत पटाईत असणाऱ्या दलालांचा वापर...

महायुती नवा डाव टाकला! उत्सुकता संपली? पारनेर मतदार संघाचा उमेदवार ठरला! कुणाला मिळाली उमेदवारी? वाचा…

पारनेर | नगर सह्याद्री:- महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार राणीताई लंके यांच्या विरोधात...