महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ कोतकर यांची भव्य बाईक रॅली
अहमदनगर | नगर सह्याद्री
केडगावमध्ये माजी सभापती भानुदास कोतकर, माजी महापौर संदीप कोतकर, उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी केडगाव व केडगाव परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास केला छोट्याशा रोपट्याचा आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा वटवृक्ष झाला आहे. केडगाव चा झपाट्याने विकास झाला असून केडगावची जनता नेहमी विकास कामे जो करतो त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते हा केडगाव चा इतिहास आहे असे प्रतिपादन उद्योजक सचिन कोतकर यांनी केले. दरम्यान महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या रॅलीत माजी महापौर संदीप कोतकर यांचे फ्लेक्स झळकले.
महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय व विखे यांच्या प्रचारार्थ केडगाव भैरवनाथ पतसंस्था इथून भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मनपाचे माजी सभापती मनोज कोतकर, भूषण गुंड, जालिंदर कोतकर, निलेश सातपुते, बापू सातपुते, सागर सातपुते, गणेश सातपुते, पोपट कराळे, बच्चन कोतकर, अजित कोतकर, उमेश कोतकर आदींसह केडगाव पंचक्रोशीतील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोतकर म्हणाले की डॉ. सुजय विखे यांनी केडगावला खासदार निधीच्या माध्यमातून अनेक विकास काम केलीआहेत. केडगावच्या विकासात त्यांनी भर घातली असून मोठे उपनगर म्हणून केडगावची वेगळी ओळख आहे. विकास कामे जो करील त्याच्या पाठीशी केडगावकर उभे असतात. त्यांनी केलेल्या विकास कामाची परतफेड म्हणून आम्ही सर्व केडगावकर मतदानाच्या माध्यमातून त्यांना दाखवून देऊ त्यांना मोठ्या मताधियाने निवडून देऊ असे ते म्हणाले. यावेळी मनोज कोतकर जालिंदर कोतकर निलेश सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.