Sambhaji Bhide Guruji : सांगलीमध्ये हिंदुत्ववादी नेते संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात ते जखमी झाले असून, त्यांच्यावर सांगली जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यावेळी भिडे गुरुजी हे धारकर यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटपून परतताना ही घटना घडली आहे. दरम्यान, सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली. कार्यक्रमावरून घराच्या दिशेने जात असताना संभाजी भिडे गुरुजींवर कुत्र्याने हल्ला करत त्यांच्या पायाला चावा घेतला. सांगली शहरातील माळी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घडला. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भिडे गुरूजींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास धारकरांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटपून ते घरी जात होते तेव्हा ही घटना घडली.
संभाजी भिडे यांना सांगलीमध्ये कुत्रा चावल्याच्या घटनेनंतर महापालिकेला जाग आली असून शहरातील कुत्रे पकडण्याची मोहीम पालिकेने सुरू केली आहे .ज्या ठिकाणी संभाजी भिडे यांना कुत्र्याने चावा घेतला त्या परिसरात महापालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम पालिकेकडून राबवण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरातल्या विविध भागात देखील आता महापालिकेकडून कुत्रे पकडण्यात येत आहेत. सांगली महानगर पालिकेच्या डॉग व्हॅन पथकाकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.