spot_img
अहमदनगरशहरात भगवे वातावरण; शिवजयंती धूमधडाक्यात साजरी

शहरात भगवे वातावरण; शिवजयंती धूमधडाक्यात साजरी

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती अहिल्यानगर शहरात धूमधडाक्यात साजरी करण्यात आली. चौकाचौकांत मंडप उभारून, भगवे ध्वज लावून व तेथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवून जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. विविध ठिकाणी हाती भगवे ध्वज घेऊन, मिरवणुका काढून, पोवाड्यांचा गजर करीत व गुलालाची उधळण करीत शहरात सर्वत्र भगवेमय वातावरण करण्यात आले.

जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेच्या वतीने न्यू आर्ट्स व रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा वाहनावर ठेवून शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढली. या मिरवणुकीत विद्याथ व विद्यार्थिनींनी विविध कला सादर करीत मिरवणुकीत रंग भरला. माळीवाडा येथेही महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ मंडप उभारून तेथे शिवछत्रपतींची प्रतिमा ठेवण्यात आली होती. परिसरात सर्वत्र भगवे ध्वज उभारून सर्व वातावरण भगवेमय करण्यात आले होते. येथील डॉ. ना. ज. पाउलबुधे शैक्षणिक संकुलात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष रामभाऊ बुचकूल, रामकिसन देशमुख, दादासाहेब भोइटे, रघुनाथ कारमपुरी, प्राचार्या डॉ. रेखाराणी खुराणा, अनुराधा चव्हाण, सविता सानप, डॉ. श्याम पंगा, डॉ. वेणू कोला, प्राचार्य संदीप कांबळे, भरत बिडवे, दीपक परदेशी आदींसह विद्याथ, शिक्षक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनीनी शिवाजी महाराजांवर सुंदर पोवाडा सादर करुन सर्वांचे लक्ष वेधले. पारंपारिक वेशभूषेत विद्याथ सहभागी झाले होते. यावेळी शिवाजी महाराजांची महाआरती करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्या वतीने बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी अध्यक्ष ॲड. अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, विश्वस्त पांडुरंग नन्नवरे, विजय कोथिंबिरे, गजानन ससाणे, ज्ञानेश्वर रासकर, चंद्रकांत फुलारी, गणेश राऊत आदी उपस्थित होते.कापड बाजार भिंगारवाला चौक येथे डीजेमुक्त छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सामाजिक उपक्रम साजरी करत असताना आमदार संग्राम जगताप व माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांचे नेहमीच सहकार्य लाभत असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी केले.

यावेळी श्री बडी साजन संघाचे माजी उपाध्यक्ष ज्येष्ठ संचालक धरमचंद कोठारी व शैलेश गांधी, अध्यक्ष राजेंद्र ताथेड, माजी नगरसेवक संजय चोपडा, राजेंद्र गांधी, नफिस चुडीवाला, अजय गुगळे, डॉ. सचिन बोरा, मनीष चोपडा, राजेश दायमा, सौरीत बोरा, प्रफुल्ल मुथा, प्रवीण शिंगवे, हेमंत डोशी, प्रीतम पोखरणा, रुपेश कटारिया, किशोर शहा आदी उपस्थित होते.मराठा सेवा संघ प्रणित जिल्हा मराठा नागरी पतसंस्थेच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने मार्केटयार्ड येथील शाखेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, व्हा. चेअरमन बाळकृष्ण काळे, संचालक लक्ष्मणराव सोनाळे, उदय अनभुले, द्वारकाधीश राजे भोसले, बाळासाहेब सोनाळे, संचालिका राजश्रीताई शितोळे, डॉ. कल्पनाताई ठुबे, मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ सदस्य सोपानराव मुळे, डॉ. संदीप भुकन, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष नंदिनीताई सोनाळे व स्वाती जाधव, योगिता कर्डिले, अंबिका महिला बँकेच्या सेवानिवृत्त अधिकारी करुणाताई काळे, पद्मा गांगर्डे, प्रतिभा सोनाळे, स्वाती बनकर, प्रतिभा भुकन, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड, व्यवस्थापक बबन सुपेकर, गोरख काटे, शाखाधिकारी प्रीतेश बोरुडे, पुष्पा इंगळे, रणजीत रकटाटे, कविता ढोणे, प्रशांत बोरुडे, तेजस कासार, सुप्रिया मोरे यांसह सभासद बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला....

पुण्यात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार; आयुषच्या हत्येची धक्कादायक माहिती उजेडात

पुणे / नगर सह्याद्री - पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील...

शहरात साहित्योत्सव रंगणार; संमेलनाची तयारी पूर्ण, ११, १२ सप्टेंबरला भरगच्च कार्यक्रम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य...

शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही!; मंत्री विखे पाटील

मंत्री छगन भुजबळ यांची मागणी फेटाळली मुंबई । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने...