spot_img
ब्रेकिंगश्रीमंत होण्याचा शॉर्टकट! गुप्तधनासाठी पुन्हा बळी; 'या' गावात खळबळ, पान, सुपारी, हळकुंड...

श्रीमंत होण्याचा शॉर्टकट! गुप्तधनासाठी पुन्हा बळी; ‘या’ गावात खळबळ, पान, सुपारी, हळकुंड आन आढळली उलटी बाहुली..

spot_img

Crime News: श्रीमंत होण्याचा शॉर्टकट म्हणजे गुप्तधन! आणि ते मिळवण्याच्या आशेने सक्रिय असलेल्या टोळ्या आपल्या अंधश्रद्धेमुळे पशूचे बळी देत आहेत. अशा अघोरी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक संघटना आणि शासन पातळीवर प्रयत्न करत असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शेतात सुमारे 20 ते 25 दिवसांचे डुकराचे पिल्लू गळा कापून पुरलेले आढळले आहे.

अधिक माहिती अशी: सांगोला येथील इरिगेशन कॉलनीजवळ हा प्रकार उघडकीस आला. येथील व्यसनमुक्ती संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते मोहन जाधव नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी 8 वाजता शेतात गेले. तिथे त्यांना खड्ड्यात लिंबू, नारळ, पान, सुपारी, हळकुंड, भाकरी, हळदी-कुंकू, शेंदूर आणि टाचण्या लावलेली उलटी बाहुली आढळली. त्यांनी बारकाईने पाहिले असता हा प्रकार नरबळीचा असल्याचा संशय आल्यामुळे त्यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत तो खड्डा उकरून पाहिला असता, खड्यातून दुर्गंधी येत होती. नरबळीच्या संशयावरून पोलिसांनी हळदी-कुंकू, शेंदूर, टाचण्या खोचलेली उलटी बाहुलीसह असलेला खड्डा उकरून पाहिला सुमारे 20 ते 25 दिवसांचे जनावराचे लहान पिल्लू गळा कापून पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इंजेक्शन जीवावर बेतलं, दोन चिमुरड्यांचा मृत्यू!; ‘या’ हॉस्पिटलमध्ये घडला प्रकार

Butox Injection Death: एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली...

राष्ट्रवादीची ताकद वाढणार; ‘या’ ४ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार?

Politics News: सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. जिल्ह्यातील चार माजी आमदार...

अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार; महिलेच्या बंगल्यावर दरोडा

अकोले | नगर सह्याद्री अकोले शहरातील परवानाधारक देशी दारू विक्रेत्या काशीबाई म्हतारबा डोंगरे (रा.देवठाण रोड...

‘मळगंगा देवीच्या घागर दर्शनासाठी लोटला जनसागर’

निघोज | नगर सह्याद्री राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता....