spot_img
अहमदनगरAhmednagar: दरोडा टाकणारे अडकले जाळ्यात! पाच दरोडेखोरासाठी 'असा' लावला सापळा

Ahmednagar: दरोडा टाकणारे अडकले जाळ्यात! पाच दरोडेखोरासाठी ‘असा’ लावला सापळा

spot_img

अहमदनगर।नगर सहयाद्री-
सशस्त्र दरोडा टाकणारे पाच दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहेत. त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम, शेळ्या, मोटारसायकल असा एकूण २ लाख ४९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दीपक गौतम पवार (वय ३५, रा. टाकळी अंबड, ता.पैठण), नितीन मिसर्‍या चव्हाण (वय २०, रा. जोडमालेगांव, ता. गेवराई), गोविंद गौतम पवार (वय २०, रा. टाकळी अंबड), किशोर दस्तगीर पवार (वय १९, रा. हिरडपुरी, ता. पैठण), राजेश दिलीप भोसले (वय ३०, रा. टाकळी अंबड) असे आरोपींची नावे आहेत. २१ डिसेंबरला फिर्यादी कमलेश सुभाष वाल्हेकर (वय २३, रा. चापडगांव, ता. शेवगाव) यांच्या घरी रात्री १ च्या सुमारास चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत १ लाख ८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला. त्यानंतर २४ डिसेंबरला अभय राधाकिसन पायघन (वय २४, रा. आखेगाव, ता. शेवगाव) यांच्या घरातील महिला मंगल पायघन व रामकिसन काटे यांना मारहाण करत मुद्देमाल लांबवला.

या घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना विशेष पथक नेमून गुन्हेगरांचा शोध घेण्यास सांगितले. आहेर यांनी पोउपनि सोपान गोरे, पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संतोष लोढे आदींसह पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन विशेष पथके तयार करून तपास केला. आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा दीपक गौतम पवार व इतर साथीदारांनी केल्याचे समजले. ते टाकळी अंबड येथील घरी व घरासमोर असलेल्या पालावर आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ही पथके तेथे रवाना झाली.

घराजवळ सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच दरोडेखोर उसाच्या शेतात पळून गेले. पोलिसांनी तत्परतेने आरोपींना ताब्यात घेतले. यातील आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी की लुटण्यासाठी?; आमदार जगताप यांचा सवाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या दरोडे महिलांच्या...

शहर विकासाच्या आड मनपाच्या टीपीची किड!

पालकमंत्री विखे पाटलांनी स्वतंत्र बैठक घेण्याची गरज | आ. जगताप यांच्या विरोधात जनमत तयार...

सत्ताधारी पुरोगामी मंडळाला मोठा धक्का! परिवर्तन मंडळाचा २१ जागांवर विजय..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने २१ जागांवर मुसंडी...

कार्यकर्त्यांची फौज अन्‌‍ जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर जपणारे ‘अरुणकाका’

सारिपाट / शिवाजी शिर्के नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेल्या अरुणकाका जगताप यांनी पुढे जाऊन काही...