spot_img
अहमदनगरहत्याराचा धाक दाखवून युवकास लुटले; असा घडला प्रकार

हत्याराचा धाक दाखवून युवकास लुटले; असा घडला प्रकार

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री –
युवकाला धारदार हत्याराचा धाक दाखवून ४० हजार रूपये किमतीचे १६.५९० ग्रॅम सोन्याचे ब्रेसलेट बळजबरीने चोरून नेले. १५ नोव्हेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास वडगाव गुप्ता (ता. नगर) शिवारात आठरे पाटील स्कूलकडे जाणार्‍या रस्त्यावर ही घटना घडली.

या प्रकरणी फरहान अल्लाबक्ष दलवाई (वय २३ रा. ढवण वस्ती, सावेडी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. १५ नोव्हेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास फरहान अल्लाबक्ष दलवाई त्यांच्या दुचाकीवरून वडगाव गुप्ता गावाकडे आठरे पाटील स्कूल रस्त्यावरून जात असताना त्यांना दोन इसमांनी दुचाकी आडवी लावली.

त्या इसमांनी धारदार हत्याचाराचा धाक दाखवून दलवाई यांच्याकडील ४० हजार रूपये किमतीचे १६.५९० ग्रॅमचे सोन्याचे ब्रेसलेट बळजबरीने काढून घेतले. घाबरलेल्या दलवाई यांनी याची माहिती नातेवाईकांना दिली. दुसर्‍या दिवशी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती देत गुन्हा दाखल केला.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आडकला जाळ्यात; नेमकं प्रकरण काय?

अहमदनगर । नगर सहयाद्री बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील एका कंत्राटी कर्मचार्‍याला...

बाप-लेकाच्या नात्याचा भयानक शेवट! जन्मदात्या मुलाने बापाला एका क्षणात संपवलं..

Ahmednagar Crime: कटूंबामध्ये वाद होणं ही काही नवीन बाब नाही. परिवारात किरकोळ कारणावरून नेहमीच...

ठरलं! अजित पवार कुठून निवडणूक लढवणार? प्रफुल्ल पटेल यांनी केली घोषणा..  

Maharashtra Politics News: महायुतीने महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. महायुतीच्या 235 उमेदवारांची पहिली...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीतील युवा लोकांना मिळणार खुशखबर?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी...