spot_img
आर्थिकतांदूळ मिळणार फक्त २५ रुपये किलो ! महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारची...

तांदूळ मिळणार फक्त २५ रुपये किलो ! महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारची योजना

spot_img

नई दिल्ली / नगर सह्याद्री :
सातत्याने वाढणारी महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना करत असते. नुकतेच शासनाने डाळ, पीठ आदींच्या भरमसाठ किमती वाढल्यानंतर केंद्राने स्वस्त दरात ‘भारत आटा’, ‘भारत डाळ’ आदी स्वस्त दरात उपलब्ध करून दिले. आता केंद्र सरकार ‘भारत तांदूळ’ विकणार आहे. लोकांना एक किलो तांदूळ अवघ्या 25 रुपयांत मिळणार आहे.

25 रुपयात तांदूळ
एका वृत्तानुसार, भारत सरकार नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भंडारच्या माध्यमातून स्वस्त तांदूळ विकणार आहे. लोक 25 रुपये किलोने ‘भारत तांदूळ’ खरेदी करू शकतील. काही काळापासून तांदळाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. यंदा तांदळाच्या दरात १४.१ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. सामान्य नॉन-ब्रँडेड तांदळाची किंमत सरासरी ४३.३ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. अशा स्थितीत तांदळाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने भारत ब्रँड अंतर्गत स्वस्त तांदूळ विकण्याचा निर्णय घेतला.

भारत पीठ, भारत डाळीची आधीपासूनच विक्री
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने याआधी भारत ब्रँड अंतर्गत स्वस्तात पीठ, डाळी विक्री करत आहे. ६ नोव्हेंबर २०२३ रोजी केंद्र सरकारने भारत आटा लाँच केला होता, ज्यामध्ये लोकांना २७.५० रुपये किलो दराने स्वस्त पीठ मिळू शकते. ६० रुपये किलो दराने भारत डाळ विकत आहे. यापूर्वी कांदा आणि टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असताना सरकारने जनतेला बाजारापेक्षा कमी दरात कांदा आणि टोमॅटो उपलब्ध करून दिला होता. आता तांदूळ २५ रुपये किलोप्रमाणे विकले जाणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...

संशयाच्या भुताने संसाराची राख रांगोळी; पत्नीचा निर्घुण खून

पत्नीचा निर्घुण खून । पतीला अटक अहिल्यानगर। नगर सहयाद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे...

पेट्रोल पंपावर ऑनलाइन पेमेंट बंद! कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री:- डिजिटलच्या युगात सर्व ऑनलाइन झाले आहे. पेट्रोल भरल्यानंतरही आपण ऑनलाइन पद्धतीने...

धनलक्ष्मीचा योग आला! ‘या’ राशींच्या जीवनात पैशांचा पाऊस पडणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य एकदा का हे प्रश्न सुटले की घरातील वातावरण...