spot_img
अहमदनगरAhmednagar News Today: पैसे सोडा एटीएम मशीनच पळवली! एका चुकीमुळे टोळीच अडकली

Ahmednagar News Today: पैसे सोडा एटीएम मशीनच पळवली! एका चुकीमुळे टोळीच अडकली

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री-
Ahmednagar News Today: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने एटीएम मशीन चोरणारी टोळी जेरबंद केली. भरत लक्ष्मण गोडे, सुर्यभान उर्फ काळ्या लक्ष्मण गोडे, अशोक रघुनाथ गोडे, सुयोग अशोक दवंगे, अजिंय लहानु सोनवणे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून १ लाख ४२ हजार रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडी, मोबाईल व तुटलेले एटीएम असा ७ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अकोले तालुयातील समशेरपूर फाटा येथील आदिवासी सहकारी सोसायटी कॉम्प्लेसच्या गाळ्यामधील एटीएम चोरी झाले होते. ही घटना २३ डिसेंबरच्या रात्री घडली होती. चोरटयांनी एटीएम मशिनला दोरखंड बांधून ती मशिन बोलेरो गाडीने बाहेर ओढून काढली व घेऊन फरार झाले. नितीन सखाराम पाटील यांनी याबाबत अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते.

आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि हेमंत थोरात, पोहेकॉ बबन मखरे, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी आदींचे पथक तयार करून तपास सुरु केला. या पथकाने समशेरपूर परिसरामध्ये जाऊन परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना हे एटीएम मशिन भरत लक्ष्मण गोडे (रा तिरडे, ता.अकोले) याने त्याच्या साथीदारांसह पळवल्याचे कळले.

पथकाने तो असलेल्या ठिकाणी जात कारवाई केली. पथकाने यावेळी वरील पाच आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी गणेश लहू गोडे याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. यातील आरोपी भरत लक्ष्मण गोडे हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास अकोले पोलीस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...