spot_img
अहमदनगर‘नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकास तुडुंब प्रतिसाद

‘नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकास तुडुंब प्रतिसाद

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री – महात्मा गांधींच्या हत्येवर आधारित नथुराम गोडसे बोलतोय’ या गाजलेल्या नाटकाच्या विशेष प्रयोगाचे आयोजन नगर जिल्हा ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने करण्यात आले होते. या नाटकास नगरच्या रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आ. संग्राम जगताप व जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आ.संग्राम जगताप यांनी नगर वासीयांच्या वतीने नाटकातील प्रमुख अभिनेते शरद पोंक्षे यांचा सत्कार केला.
प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी या नाटकातून नथुराम विनायक गोडसे यांची भूमिका साकारत महात्मा गांधींच्या हत्या मागची भूमिका आणि सत्य घटना त्यांनी नाट्य रूपाने मांडल्या. आफ्रिकेतील वर्णद्वेषा विरोधातला लढा, मिठाचा सत्याग्रह, भारत भ्रमण यात्रा तसेच चलेजाव आंदोलन हे महात्मा गांधींचे मोठे योगदान असून त्यासाठी त्यांना वंदनच आहे. परंतु भारताच्या फाळणीसाठी गांधींनी घेतलेला पुढाकार, फाळणी नंतर देशात हिंदू मुस्लीम मध्ये उसळलेला जातीय हिंसाचार, लाखो निर्वासित हिंदूंच्या झालेल्या कत्तली, गांधींचे पाकिस्तानसाठीचे झुकते माप, पाकिस्तानला ५५ कोटी मिळावे यासाठी गांधींनी केलेलं उपोषण, गांधींचे निर्णय हे राष्ट्रहिताचे नसून राष्ट्रद्रोहाचेच आहेत. अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पाहणार्‍या हिंदू महासभेचा कार्यकर्ता नथुराम गोडसे यासर्व भारत विरोधातील गोष्टींमुळे उद्विग्न होऊन आपल्या अग्रणी आणि हिंदू राष्ट्र या वर्तमानपत्रांच्या अग्रलेखातून त्यांनी गांधी व मोहंमद अली जिना यांच्या फुटीरतेच्या विचारांना प्रखर विरोध केला. हे सर्व थांबविण्यासाठीच नथुराम गोडसे गांधींची हत्या करतो.

गांधी हत्या देशाच्या भवितव्यासाठी असल्याने तो वध आहे असा दावा करणार्‍या नथुराम गोडसेचा गांधींशी वैचारिक संघर्ष प्रभावीपणे नाटकात दाखविण्यात आला. गांधी हत्येचा तपास अधिकारी पोलिस अधीक्षक शेख आणि नथुराम गोडसे यांच्यातील संघर्षाचा झालेला भावनिक शेवट, महात्मा गांधींचा मुलगा देविदास यांनी नथुरामच्या फाशिविरोधत वकीलपत्र घेण्याची दाखविलेली तयारी किंवा माफीचा साक्षीदार दिंगबर बडगे याच्याशी झालेली नथूरामची शेवटची भेट यासर्व घटना अभिनेते शरद पोंक्षे यांनी नाट्यरूपाने साकारून प्रेक्षकांना खिळवून ठेवले. अखंड हिंदुस्थानाचा नकाशा, भगवाध्वज व भगवत् गीता हातात घेवून नथुराम गोडसेच्या फाशीने झालेला नाटकाचा समारोप प्रेक्षकांना विचार करायला लावणारा ठरला. प्रारंभी जिल्हा ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष किशोर जोशी यांनी आ.संग्राम जगताप व जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांचा सत्कार करून स्वागत केले.

यावेळी जिल्हा ब्राह्मण संघाचे उपाध्यक्ष राजकुमार जोशी, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संतोष गेनप्पा, जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे, नरेंद्र कुलकर्णी, मयूर कुलथे, आदिनाथ येंडे, उत्कर्ष गीते, विशाल पवार, दिनेश जोशी, मंदार मुळे, सोमनाथ मुळे, पंकज धर्माधिकारी, विभव निसर्गंड आदींसह मोठ्या संख्यने रसिक उपस्थित होते. स्नेहा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

तर शिक्षकांनी राजीनामा द्यावा लागणार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

नागपूर / नगर सह्याद्री - खडतर अर्थात जास्त काठीण्य पातळी असणारी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण...

मुंबई हायअलर्टवर! गणपती विसर्जनाआधी दहशतवादी हल्ल्याची धमकी ; ३४ मानवी बॉम्ब अन आरडीएक्स…

मुंबई / नगर सह्याद्री - मुंबईमध्ये गणपती विसर्जनादरम्यान आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात...

‌’अजित पवार चोरांचे सरदार‌’; कोणी केला आरोप?, वाचा सविस्तर..

मुंबई । नगर सहयाद्री: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका पोलीस अधिकारी महिलेला फोनवरून तंबी...

शहरातील वाहतुकीत बदल, जड वाहनांना दिवसा प्रवेश बंद, वाचा पर्यायी मार्ग

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील वाढत्या जड वाहन वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण...