spot_img
अहमदनगरशेतकऱ्यांना दिलासा, बाजार समितीतील 'तो' निर्णय मागे; सभापती म्हणाले..

शेतकऱ्यांना दिलासा, बाजार समितीतील ‘तो’ निर्णय मागे; सभापती म्हणाले..

spot_img

अहमदनगर । नगर सह्याद्री

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नगर बाजार समितीतील भाजीपाला व कांदा विभाग शनिवारी (दि.४) बंद ठेवण्यात येणार होता. मात्र मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुटल्याने हा बंद मागे घेण्यात आला असून बाजार समितीतील सर्व व्यवहार शनिवारी सुरळीत सुरु राहणार असल्याची माहिती सभापती भाऊसाहेब बोठे यांनी दिली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती येथील दि भाजीपाला फळफळावर अडत्यांची असोसिएशनने शनिवारी (दि.४ नोव्हेंबर) बंदची हाक दिली होती. शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाजीपाला व कांदा विभाग बंद राहणार होता. मात्र गुरुवारी (दि.२) रात्री मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेत असल्याबाबतची घोषणा केलेली आहे.

त्यामुळे शनिवारी मार्केट बंद ठेवून काही साध्य होणार नाही. यामुळे मार्केट सुरू ठेवणे बाबत फळे भाजीपाला व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोकराव लाटे, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांचे समवेत मोबाईलद्वारे संपर्क साधून चर्चा झालेली आहे व मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे सभापती बोठे यांनी सांगितले.

तरी सर्व अडतदारांनी आपल्या आपल्या दुकानावरील हमाल,मापाडी यांना संपर्क करून आडत दुकान चालू असले बाबत सर्वांना कळवावे. तसेच फेसबुक, व्हाट्सअप व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकर्‍यांनाही जास्तीत जास्त प्रमाणात माहिती प्रसारित करण्यात यावी. तसेच शेतकर्‍यांनीही आपला शेतमाल विक्रीसाठी शनिवारी बाजार समितीत आणावा असे आवाहन सभापती भाऊसाहेब बोठे, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, भाजीपाला फळफळावळ आडते असोसिएशन अध्यक्ष अशोकराव लाटे आदींनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हात, पाय, मुंडके तोडलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडले

माउली गव्हाणे खून झालेल्या व्यक्तीचे नाव | सागर गव्हाणे आरोपी श्रीगोंदा | नगर सह्याद्री -  श्रीगोंदा...

शिवजयंती धूमधडाक्यात साजरी  

अहिल्यानगर | नगर सह्याद्री हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती सोमवारी नगर शहरात...

कर्मवीर अण्णा, ‘रयत’चे काही शिक्षक का झालेत सैराट?; नगरच्या ‘या’ शाळेत तब्बल सात शिक्षक निघाले सैराट…

पवार साहेब, आवरा तुमच्या जनरल बॉडी सदस्यांसह पदाधिकार्‍यांना / पठार भागातील पालकांनी मुली शाळेत...

लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांची मोठी घोषणा; म्हणाले “योजना बंद करणार नाही, पण…”

मुंबई / नगर सह्याद्री : लाडकी बहिण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. या योजनेअंतर्गत दर...