spot_img
ब्रेकिंगप्रॉपर्टी खरेदी करताय? 'या' दिवशीही राहणार सुरु नोंदणी कार्यालय

प्रॉपर्टी खरेदी करताय? ‘या’ दिवशीही राहणार सुरु नोंदणी कार्यालय

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री

प्रॉपर्टी खरेदी विक्रीची नोंदणी नागरिकांना सुलभरित्या करता यावी यासाठी सह दुय्यम निबंधक कार्यालय आता शनिवारी व रविवारी या सुटीच्या दिवशीही सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ यावेळेत खुले राहणार आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक , महाराष्ट्र राज्य यांनी जारी केलेल्या आदेशाची नगरमध्ये सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडून अंमलबजावणी सुरु झाली आहे, अशी माहिती सह जिल्हा निबंधक वर्ग- १ शरद झोटिंग यांनी पत्रकान्वये दिली आहे.

रियल इस्टेट क्षेत्रात खरेदी विक्रीची नोंदणी अतिशय महत्वाची असते. अनेकदा नागरिकांना या नोंदणीसाठी स्वत: सुटी घेऊन निबंधक कार्यालयात जावे ल ागते. त्यामुळे अनेकदा नागरिकांना कामाच्या ठिकाणावर रजा घ्यावी लागते किंवा व्यवसाय असेल तर तो बंद ठेवावा लागतो. त्यामुळे राज्यात नोंदणी कार्यालये शनिवारी, रविवारी या शासकीय सुटीच्या दिवशी खुले ठेवण्याची मागणी होत होती. त्या प्रमाणे राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीन पैकी एक दुय्यम निबंधक कार्यालय सुरु ठेवणेचे घोषित केले होते . त्याची अंमलबजावणी करत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक , महाराष्ट्र राज्य यांनी सदर आदेश जारी केलेत. त्यामुळे आता नगरमधील पराग बिल्डिंग येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय शनिवारी, रविवारी खुले राहणार आहे. या कार्यालयाला मंगळवारी, बुधवारी सुटी राहिल.

क्रेडाई अहमदनगर तसेच अहमदनगर शहर आणि नगर तालुयातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करून महसूलमंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ.संग्राम जगताप, आ.निलेश लंके, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक एच. एस. सोनवणे, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक व्हि. एस . भालेराव, शरद झोटिंग यांचे आभार व्यक्त केले आहेत. क्रेडाई नगर चे अध्यक्ष अमित मुथा, सचिव प्रसाद आंधळे, अमित वाघमारे, दीपक बांगर, संजय पवार, ड. आर. टी. शर्मा यांचे आभार व्यक्त केले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...