spot_img
महाराष्ट्रमराठा आमदार एकवटले! मुंबईत गोपनीय बैठक? केली 'अशी' एकमुखी मागणी

मराठा आमदार एकवटले! मुंबईत गोपनीय बैठक? केली ‘अशी’ एकमुखी मागणी

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन बीड, परभणी, धाराशीव जिल्ह्यांत आंदोलकांकडून राजकीय नेत्यांना लक्ष्य केले आहे. बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर आणि माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंखे यांच्या घरांची जाळपोळ झाली. त्यामुळे बीड जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यासोबतच संचारबंदी लागू करण्याची वेळ आली. पंढरपूरमध्ये मंगळवारी सकाळी एका एसटी बसला आग लावली. या सगळ्या घडामोडींमुळे राज्यातील मराठा आमदार, नेते धास्तावले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वपक्षीय मराठा आमदारांची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार बैठकीचे ठिकाण गुप्त ठेवले आहे. बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनाच्या सद्यस्थितीवर चर्चा करुन पुढील रणनीती ठरवली जाण्याची शयता आहे. बैठकीनंतर सर्वपक्षीय मराठा आमदारांकडून आरक्षणासाठी राज्य सरकारवर दबाव आणला जाऊ शकतो. त्यामुळे आता बैठकीत नेमका कोणता ठराव मंजूर होतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन आतापर्यंत शिंदे गटाच्या हेमंत गोडसे आणि हेमंत पाटील या दोन खासदारांनी राजीनामे दिले आहेत.

मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष अधिवेशन बोलावले जाण्याची शयता आहे. या अधिवेशनाचा कालावधी तीन ते पाच दिवसांचा असू शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सिस्पे विरोधात ठेवीदार आक्रमक; पाच दिवसात पैसे जमा न झाल्यास…, काय दिलाय इशारा पहा

  पारनेर / नगर सह्याद्री- पारनेर, सुपा परिसरातील सुमारे चारशे कोटी रूपयांना गंडा घालणाऱ्या 'सिस्पे कंपनी'...

नगरसेवकाची आरोग्य अधिकाऱ्यास दमबाजी; मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले असून संबंधितांवर कारवाई करावी - सचिव...

कामात अडथळा, जीव मारणे प्रकरणी नगरसेवक कोतकर, बोराटेंवर एफआयआर, काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बाबूराव राजुरकर यांच्या तक्रारीवरून नगरसेवक...

आमदार माजलेत….; विधानसभेत फडणवीस संतापले, काय घडलं जाणून घ्या

मुंबई / नगर सह्याद्री - विधानभवनात गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण विधिमंडळाच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं...