spot_img
अहमदनगरशिक्षक दरबारात वाचला गेला 'त्या' तक्रारींचा पाढा; आमदार दराडे म्हणाले, तातडीने..

शिक्षक दरबारात वाचला गेला ‘त्या’ तक्रारींचा पाढा; आमदार दराडे म्हणाले, तातडीने..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शहरात शिक्षण उपसंचालक (पुणे) राजेंद्र आहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी घेतलेल्या शिक्षक दरबारमध्ये शिक्षक, शिक्षकेतरांचे विविध प्रश्न सोडविण्याचे शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना आदेश देण्यात आले. तर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्राथमिक व माध्यमिक विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीसाठी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, वेतन पथक अधीक्षक (माध्यमिक) रामदास म्हस्के, वेतन पथक अधीक्षक (प्राथमिक) हेमंत साळुंखे, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, संध्या भोर, बाळासाहेब धनवे, जळगावचे शिक्षक नेते संभाजी अप्पा पाटील, नाशिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. बी. देशमुख, भाऊसाहेब रोहोकले, मिथुन डोंगरे, संभाजी पवार, ज्ञानदेव बेरड, बंडू मखरे, अप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, वैभव सांगळे, महेंद्र हिंगे, अशोक आव्हाड, राजेंद्र डमाळे, रवींद्र देवडे, पोपट बोडखे, क्रीडा संघटनेचे राजेंद्र कोतकर, नंदकुमार शितोळे, देविदास पालवे, घनश्याम सानप, शिरीष टेकाडे, रमजान हवालदार, सुनील दानवे, दिलीप काटे, भास्करराव सांगळे, बापूसाहेब तांबे, राजेंद्र निमसे, रोहोकले गुरुजी, विठ्ठल उरमुडे, शेखर उंडे, अन्सार सय्यद, समीर पठाण, शिक्षकेतर संघटनेचे भानुदास दळवी, भारत दळवी, गोवर्धन पांडुळे आदींसह प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर संघटनेचे प्रतिनिधींसह प्रश्न घेऊन आलेले शिक्षक व शिक्षकेतर वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुरुडगाव रोड येथील रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय कार्यालयात दुपारी १ वाजता प्राथमिक विभागाच्या बैठकीला प्रारंभ झाले. प्राथमिकच्या बैठकीत शालेय पोषण आहारात वाढविण्यात आलेले मेनू, वेळेवर पोषण आहाराचे न मिळणारे साहित्य व निकृष्ट दर्जा आणि कमी प्रमाणात मिळत असलेल्या अन्न-धान्याबाबत तक्रारी शिक्षकांनी केल्या. यावर शिक्षण उपसंचालक आहिरे यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन तपासणी करण्याचे सूचना केल्या. तसेच गटशिक्षणाधिकारी यांच्यावर असलेल्या विविध आरोपांचा मुद्दा बैठकीत चांगलाच गाजला. शिक्षक आमदार दराडे यांनी त्यांची खरडपट्टी करुन चुकीच्या पध्दतीने सुरू असलेले कार्य व शिक्षकांच्या तक्रारीवर त्यांना खडेबोल सुनावले.

खाजगी प्राथमिक शाळांचे मागील सर्व पेंडिंग स्वमान्यता प्रस्ताव कॅम्प लावून वितरित केले जाणार आहेत. वरिष्ठ व निवड श्रेणी मंजूर झालेल्या शिक्षकांची फरक बिले आणि वैद्यकीय बिले वेतन पथक कार्यालयाकडून निधी उपलब्ध झाल्याबरोबर पारित करण्याचे सूचना यावेळी देण्यात आल्या. या बैठकीनंतर माध्यमिक विभागाची दुसरी बैठक पार पाडली. या बैठीकीत शालार्थ आयडी, शिक्षकेतर, ग्रंथपाल यांच्या प्रश्नांसह एजंटगिरीचा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला. आमदार दराडे यांनी पैशासाठी शिक्षकांना वेठीस धरणे हा गंभीर प्रकार असून, यासंदर्भात चौकशी करण्याच्या सूचना केल्या. वैयक्तक, अर्धवेळ व निवडश्रेणी मान्यता, उपसंचालक स्तरावरील प्रलंबित वैद्यकीय देयके, संचमान्यता, अनुकंपा तत्त्वावरील मान्यता, १० वी व १२ वी बोर्डाच्या परीक्षेत शिक्षकांवर होणारे प्राणघातक हल्ले, सेवापूर्ती दाखले, फरक बिले, मेडिकल बिले, डीसीपीएस, एनपीएस व पीएफ च्या पावत्या मिळण्यासह विविध प्रश्नांवर चर्चा रंगली होती.

आई-वडिलांच्या निधनानंतर उपासमारीची वेळ आलेली असताना अनुकंपावर शिपाई पदासाठी खडांबे विद्यालयात रुजू होण्यासाठी मंजूरी दिली जात नसल्याचा युवकाने अशरक्ष: सर्वांसमोर हंबरडा फोडून प्रश्न मांडला. सदर युवकाला आमदार दराडे यांनी धीर देत, हा प्रश्न तातडीने निकाली काढण्याच्या सूचना केल्या. यावर शिक्षणाधिकारी कडूस यांनी येत्या आठ दिवसात अनुकंपाच्या शिपाई पदासाठी मान्यता देण्याचे आश्वासन दिले. विविध प्रश्नांवर अधिकार्‍यांसमोर प्रश्नांची उत्तरे घेऊन त्यावर तोडगा काढत दराडे यांनी अनेक प्रश्न या शिक्षक दरबाराच्या माध्यमातून निकाली काढले. दुपारी सुरु झालेला शिक्षक दरबार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु होता.

कोणत्याही अधिकार्‍याला वेठीस धरण्याचा उद्देश नाही
शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्न प्रामुख्याने मार्गी लागावे या प्रामाणिक हेतूने शिक्षक दरबार घेण्यात येत आहे. कोणत्याही अधिकारी वर्गाला वेठीस धरण्याचा उद्देश नाही. फरक बिल, मेडिकल बिल टॅप ओपन झाल्यावर मिळणार आहे. लहानमोठे प्रश्न या बैठकीच्या माध्यमातून सोडविण्यात येत आहे. – किशोर दराडे (नाशिक विभाग, शिक्षक आमदार).

आमदार दराडे यांयाकडून प्रश्न सोडविण्याचे काम
शिक्षक दरबारात न्याय मिळण्यासाठी आसुसलेले व ज्वलंत प्रश्नांनी रडणारे चहेरे प्रश्न सुटल्यानंतर हसताना बाहेर पडले. हीच खरी कामाची पावती आहे. पोटतिडकीने शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्न सोडविण्याचे काम आमदार दराडे करत आहे. – अप्पासाहेब शिंदे (अध्यक्ष, माध्यमिक शिक्षक संघ)

पीएफ पावत्या मिळणार
डीसीपीएस व एनपीएस खातेधारक शिक्षकांच्या खात्यावर लवकरच पैसे वर्ग करण्याचा दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे. पीएफच्या पावत्या मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे. शिक्षण विभागातील कारभार पारदर्शीपणे होण्यासाठी शिक्षक आमदार दराडे महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
– वैभव सांगळे (समन्वयक, जुनी पेन्शन संघटना)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाउन्सरची दहशत मोडून काढणार ‘राऊळबुवा’!

दाखवायचं कोणाला आणि झाकायचं कोणाचं ? एक कुटुंब महिन्याला कर्मचार्‍यांचे पगार तर दुसरे कुटुंब...

Accident News: बस-आयशरच्या भीषण अपघातानं शहर हादरलं; एकाचवेळी सहा ठार, कुठे घडली घटना?

Accident News: वडीगोद्री मार्गावरील शहापूर जवळील वळणावर बस आणि संत्रा वाहतूक करणार्‍या आयशरचा भीषण...

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकावर तलवारीने हल्ला? हैराण करणार कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत २ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डी जे मागे...

Politics News: लाडका दाजी बिबट्याच्या दहशतीखाली! आ. तनपुरेचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

Politics News: निवडणुकीच्या तोंडावर निळवंडे धरण कालव्यांची कामे थातूरमातूर कले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)...