spot_img
ब्रेकिंग‘अवकाळी’ पावसाची पुन्हा एन्ट्री! देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात धुमाकूळ

‘अवकाळी’ पावसाची पुन्हा एन्ट्री! देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात धुमाकूळ

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे सध्या राज्यात पावसाने हजेरी लावली. पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शयता कायम आहे. विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने काल (२६ फेब्रुवारी) हजेरी लावली. देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात सोमवारी पावसाने धुमाकूळ घातला. कडकडाट आणि वादळी वार्‍यांसह पाऊस झाला.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुयाला रात्री आठ वाजताचे सुमारास अचानक अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाल्याने त्याचा फटका रब्बी हंगाममधील गहू, हरभरा, मकासह फळपिकांना बसला असून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

विजेच्या कडकडाटासह चाळीसगाव शहरासह तालुयातील अनेक भागात हा गारपीटसह मुसळधार पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुयातील पाटणा, गणेशपूर, बेलदारवाडी, बाणगाव, शिंदी आणि ओढरे गावात गारपीट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

यात सर्वाधिक गहू आणि हरभरा पिकाला फटका बसला आहे. अचानक आलेल्या पावसाने गहू, हरभरा, संत्रा पिकाला तडाखा बसला आहे. काढणीला आलेल्या शेतपिकांना याचा फटका बसत आहे. वादळी वार्‍यामुळे संत्रा बागेत फळाची गळ झाल्याने नुकसान झाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जरांगेंसह मराठ्यांच्या रोषाचे धनी देवेंद्र फडणवीस?

आंदोलनाची व्याप्ती वाढत चालल्याने देवाभाऊंसह गृहखात्याची संपूर्ण यंत्रणा सपशेल अपयशी | जरांगे पाटलांची मुख्य...

‘आंदोलनाला परवानगी दिलीच कशी?’ हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल, कोर्टात नेमकं काय घडलं? दिला मोठा आदेश

मुंबई / नगर सह्याद्री - Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी मुंबईत आझाद मैदान येथे मनोज...

आंदोलनावर तोडगा न निघाल्यास…; पारनेर तालुक्यातील सकल मराठा समाजाचा इशारा..

पारनेर | नगर सह्याद्री मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते...

सीएसएमटी स्थानकात आंदोलकांचा गोंधळ!, लोकल अडवली, पुढे नेमकं काय घडलं?

रुळावर उतरून लोकल अडवली | चौथ्या दिवशी आंदोलन तीव्र मुंबई | नगर सह्याद्री मराठा आरक्षणाचा मुद्दा...