अहमदनगर / नगर सह्याद्री –
अहमदनगर लोकसभेसाठी महायुतीकडून खासदार सुजय विखे पाटील यांना तर महाविकास आघाडीकडून आमदार नीलेश लंके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे लोकसभेसाठी रणांगण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे (सोमवारपासून) पाथर्डी तालुयातील मोहटादेवी गडावरून आपल्या प्रचाराचा शुभारंभ करत आहेत.
लंके यांच्या जनसंवाद यात्रेच्या शुभारंभासा अनेक मान्यवर आमंत्रित करण्यात आले आहेत. त्यात शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत हे ही येणार आहेत. राऊत येणार असल्याचे माजी आमदार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा निका सांगून टाकला आहे.
आ. निलेश लंक यांच्या जनसंवाद यात्रेच्या शुभारंभाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी अंकुश काकडे यांची उपस्थिती असणार आहे. मात्र संजय राऊतांच्या उपस्थितीवरून भाजपा नेते शिवाजी कर्डीले यांनी जोरदार टीका केली आहे.
शिवाजी कर्डिले म्हणाले की, निलेश लंके हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. त्यामुळे नेत्यांच्या त्यांच्या प्रचाराला यावे लागणार आहे. परंतु संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. संजय राऊत ज्या ठिकाणी जातात त्याठिकाणच्या उमेदवाराला १०० टक्के अपयश येते. ते जर लंके यांच्या जनसंवाद यात्रेला येणार असतील तर अहमदनगर दक्षिण लोकसभेचा निकाल उद्याच लागला असं समजावं, अशी टीका त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे.