spot_img
ब्रेकिंगRashibhavishya : आजचे राशी भविष्य! 'या' राशीसाठी कसा असेल 'गुरुवार'

Rashibhavishya : आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीसाठी कसा असेल ‘गुरुवार’

spot_img

मुंबई । नगर सह्याद्री –

मेष राशी भविष्य

आजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. शरीराला तेलाने मसाज करुन तुमचे स्नायू मोकळे करा. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. अभ्यासाच्यावेळी देखील बाहेरील उपक्रमांत भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल. करिअर नियोजन हे खेळाइतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधा.

मिथुन राशी भविष्य

आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. कुणी ही अनुभव नसलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने आज असे कुठले ही काम करू नका ज्यामुळे तुम्हाला आर्थिक हानी होईल. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. तुमचा प्रियकर/प्रेयसी तुमच्यावर किती प्रेमक करतो/करते याची आज तुम्हाला जाणीव होईल.

सिंह राशी भविष्य

संयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे तुम्हाला रिकामपण वाटेल.

तुळ राशी भविष्य

सोशलाईज होण्याची चिंता भीती तुम्हाला उदास करेल. तुमच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देऊन ही चिंता नाहिशी करा. तुमचे धन कुठे खर्च होत आहे यावर तुम्हाला नजर ठेवण्याची आवश्यकता आहे अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपल्या पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज भासेल.

धनु राशी भविष्य

तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. आज तुम्ही इतरांच्या गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत करा परंतु मुलांसोबत अधिक गोडीगुलाबीने, उदार मनाने वागलात तर तुम्हाला त्रास होईल. प्रणयराधन करण्याची शक्यता नाही आणि तुम्ही दिलेली महागडी, मौल्यवान भेटवस्तू याची जादू आज फारशी चालणार नाही.

कुंभ राशी भविष्य

विनाकारण स्वत:ची निंदा करून तुमचा उत्साह घालवू नका. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवतो. स्वत:चे लाड पुरविण्यात, स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आयुष्याचे धडे गिरवा.

वृषभ राशी भविष्य

आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. दिवसभर जरी तुम्ही धन कमावण्यासाठी प्रयत्न करत असाल परंतु, संध्याकाळी तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. आज तुम्ही इतरांच्या गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत करा परंतु मुलांसोबत अधिक गोडीगुलाबीने, उदार मनाने वागलात तर तुम्हाला त्रास होईल.

कर्क राशी भविष्य

तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा. कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका.

कन्या राशी भविष्य

तुमच्यात आज उत्तम स्पुर्ती पहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे कारण, तुमच्या द्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. घरगुती कामं कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असतील. आकाश अधिक तेजस्वी दिसेल, फुले अधिक रंगीबेरंगी दिसतील, तुमच्याभोवती सगळेच लुकलुकत असेल; कारण तुम्ही प्रेमात पडला आहात!

वृश्चिक राशी भविष्य

शारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. मुलांच्याबाबतीत सहनशीलता बाळगा किंवा तुमच्या पेक्षा कमी अनुभवी व्यक्तींबाबत धीर धरा. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल.

मकर राशी भविष्य

समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आपल्या भावाला परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी मदत करा. संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका, त्याऐवजी खेळीमेळीने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्ना करा. तुमचे डोळे इतके पाणीदार व तेजस्वी आहेत की तुमच्या प्रिय व्यक्तीची अख्खी रात्र त्यात उजळून जाईल.

मीन राशी भविष्य

आजच्या विशेष दिवशी तुमच्या तंदुरुस्तीमुळे तुम्ही एखादे असामान्य काम कराल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. तुम्हाला आनंद देतील अशा गोष्टी करा, पण इतरांच्या कामापासून दूर रहा. तुमच्या प्रिय व्यक्तीकेड दुर्लक्ष केल्याने घरात काही तणावाचे क्षण अनुभवास येतील. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी खास करणार आहात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

..म्हणुन बीडमधील परिस्थिती खराब; शरद पवार यांनी साधला धनंजय मुंंडेंना घेरलं!

Politics News: बीडमधील सध्याची परिस्थिती आणि तेथील वाढत्या गुन्हेगारीवरून शरद पवार यांनी तेथील राजकारण्यांवर...

धक्कादायक! विवाहितेवर अत्याचार करत ‘तसले’ व्हिडीओ पतीला पाठविले

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर शहरातून एक मानवतेला काळिमा फसवणारी घटना उघडकीस आली आहे....

शिष्टमंडळाने मांडले जनतेचे ‘ते’ प्रश्न; आमदार दातेंनी दिली पूर्ण करण्याची ग्वाही!

पारनेर । नगर सहयाद्री:- शिष्टमंडळानी केलेल्या मागण्यासाठी लवकरच पाठपुरावा करून विकास कामांसाठी निधी मंजूर...

द्राक्षाचा गोडवा वाढला! कीलोला किती रुपयांचा दर?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव,घारगाव ,कोळगाव, वडळी, आढळगाव, कोकणगाव, हिरडगाव, बेलवंडी कोठार,...