spot_img
ब्रेकिंगBreaking : मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानक पेटले, प्रवाशांची एकच धावपळ

Breaking : मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानक पेटले, प्रवाशांची एकच धावपळ

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसला भीषण आग लागली.

दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून प्रवाशांची एकच धावपळ उडाली. लोटमान्य टिळक टर्मिनस स्थानकात बुकिंग आणि वेटिंग हॉलमध्ये ही आग लागल्याचे समजते.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या वाहनांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सर्व प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर काढले. प्रवाशांच्या यावेळी एकच धावपळ उडाली होती. दरम्यान या आगीत कुणीही जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

ही आग कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही. लोकमान्य टिळक टर्मिनस हे मुंबईतील अतिशय महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. या रेल्वे स्थानकाहून लांब पल्ल्याच्या गाड्या जातात.

तसेच देशातील वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या रेल्वे गाड्यांमधून लाखो प्रवासी या रेल्वे स्थानकावर येत असतात. या रेल्वे स्थानकावर नेहमी प्रवाशांची वर्दळ असते. लाखो प्रवासी दररोज रेल्वे स्थानकावर ये-जा करतात.

अनेक जण इथे वेटिंग रुममध्ये आपल्या ट्रेनची वाट पाहात बसलेली असतात. असं असताना अचानक रेल्वे स्थानकाला आग लागल्याने खळबळ उडाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ! मराठा आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित, मनोज जरांगेंकडून आज मोठी घोषणा

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे...

रजनीकांत 24 वर्षानंतर बॉलिवूडमध्ये धमाका करणार ! ‘या’ सिनेमात झळकणार

मुंबई / नगर सहयाद्री : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हा दिग्गज अभिनेता हा त्याच्या वैविध्यपूर्ण...

अभिनेत्री जया प्रदा का आहे फरार? नेमक्या कोणत्या प्रकरणात अडकल्यात? पहा..

मुंबई / नगर सह्याद्री : अभिनेत्री जया प्रदा हे चित्रपटसृष्टीतील नावाजलेले नाव. त्यांनी...

अहमदनगरमध्ये २३ हजार रोजगार न‍िर्माण होणार, पालकमंत्री व‍िखे यांचे मोठे सूतोवाच

अहमदनगर / नगर सह्याद्री : औद्योगिककरणाच्या दृष्टीने आपण मोठे पाऊल उचलले आहे. वर्षभरात दीड...