spot_img
राजकारणदिशा सालियन-आदित्य ठाकरे प्रकरणी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचं मोठं वक्तव्य,...

दिशा सालियन-आदित्य ठाकरे प्रकरणी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या..

spot_img

मुंबई / नगरसह्याद्री : दिशा सालियन मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजे यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे नाव जोडले जात आहे. त्यांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी देखील स्थापन केली आहे. त्यामुळे पुढच्या काही काळात आदित्य ठाकरे यांची चौकशी होणार आहे. आता यामध्ये राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केल आहे. त्या म्हणाल्या की, ‘आदित्य असं काही करेल असं मला तरी वाटत नाही’.. असे वक्तव्य करत त्यांनी आदित्य ठाकरेंवर विश्वासच दाखवला आहे.

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेश नागपूरमध्ये सुरू असून यात दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी उचलून धरला आहे. याने पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाच्या अडचणी वाढल्या आहेत. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये अपर पोलीस आयुक्त राजीव जैन, उपायुक्त अजय बंसल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी देवेन भारती हे एसआयटीवर लक्ष ठेवून राहणार आहेत.

‘उद्योग कर उद्योग कार्यक्रमा’साठी शर्मिला ठाकरे आल्या होत्या. याच संपूर्ण प्रकरणावर माध्यमांनी आदित्य ठाकरे यांच्या काकू, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या, चौकशा तर कुणीही लावेल. आम्हीही या प्रकारातून गेलो आहोत. पण आदित्य असं काही करेल असं मला तरी वाटत नाही, अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पूजा खेडकर प्रकरणात मोठा निर्णय; सुप्रिम कोर्टात काय घडलं?, वाचा एका क्लिकवर..  

IAS Pooja Khedkar News: UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा...

तुमच्या घरावर भानामती? कुटुंबावर संकट! दोन महिलांनी रचला डाव; ३३ लाखाची ‘अशी’ केली फसवणूक

Maharashtra Crime News: आजही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला जात आहे. यातून फसवणूक झाल्याचे देखील समोर...

नागरिकाभिमुख कारभारासाठी महानगरपालिका कटीबद्ध; आयुक्त यशवंत डांगे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेने गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासकीय कामकाजासाठी ई ऑफीस प्रणालीचा वापर सुरू...

‘मळगंगा देवी यात्रा उत्सवास आजपासून प्रारंभ’

  भावीकांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आमदार काशिनाथ दाते सर यांचे केले कौतुक निघोज |...