spot_img
अहमदनगरAhmednagar Politics : 'भ्रष्टाचारमुक्त महापालिकेसाठी भाजपाचाच पर्याय'

Ahmednagar Politics : ‘भ्रष्टाचारमुक्त महापालिकेसाठी भाजपाचाच पर्याय’

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : महानगरपालिकेत रोज कोणत्या न कोणत्या घोटाळ्याची माहिती उघडकीस येत आहे. याला आता जनता कंटाळली असून नगरकरांना आता स्वच्छ, प्रामाणिक समाजाचे काम करणारा सेवक हवा आहे. भारतीय जनता पार्टी नगरकरांच्या अपेक्षा पूर्ण करेल. श्वान निर्बीजीकरणापासून फेज टू च्या प्रश्नांवर आता पालिका प्रशासनाला जाब विचारला पाहिजे. या सर्वांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. महापालिकेच्या गैरकारभारावर कोणीतरी आवाज उठविला पाहिजे तो आवाज भारतीय जनता पार्टी उठवेल. भ्रष्टाचारमुक्त महापालिकेसाठी भाजपाचाच पर्याय असल्याचे प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांनी केले.

पारिजात चौक ते टेलीफोन ऑफिस पर्यंत नगरसेवक रामदास आंधळे यांच्या प्रयत्नातून बसवण्यात आलेल्या पेव्हिंग ब्लॉक कामाचा लोकार्पण सोहळा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, महिला आघाडीचे अध्यक्ष प्रिया जानवे, भाजपचे सरचिटणीस सचिन पारखी, महेश नामदे, शहर चिटणीस छायाताई राजपूत, सावेडी मंडळ अध्यक्ष नितीन शेलार, उपाध्यक्ष अनिरुद्ध घैसास, माजी नगरसेवक बाळासाहेब गायकवाड, आकाश सोनवणे, राहुल आंधळे, गोकुळ काळे, शिरीष दानवे, अभिजीत दरेकर, बबन नांगरे, महेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, नगरसेवक रामदास आंधळे यांनी प्रभाग २,४,५,६ मध्ये विकासाची कामे मार्गी लावली आहे. त्यांच्या माध्यमांतून उपनगरात अनेक विकास कामे सुरूच राहणार असून त्यासाठी नगरसेवक रामदास आंधळे हे सक्षम नेतृत्व मिळाले आहे. नुकतेच त्यांची पक्षाच्या कोषाध्यक्ष पदी निवड झाली आहे. त्या माध्यमातून देखील आता पक्षाची ध्येय धोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम ते करतील असे ते म्हणाले.

नगरसेवक रामदास आंधळे म्हणाले की, सामाजिक काम करण्याची सुरुवातीपासून आवड असल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात विकास कामे करण्याची संधी मिळाली. पुढे देखील सामाजिक कार्य असेच सुरु ठेवणार असून आता नगरसेवक पदासह पक्षाची मोठी जबाबदारी वरिष्ठांनी मला दिली आहे. त्या माध्यमातून देखील जनसेवेची संधी मिळाली असल्याने आनंद वाटतो. माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी प्रभागातील विकास कामाकरिता मोठा निधी उपलब्द करून दिला त्या माध्यमातून आज हि कामे पूर्ण होताना दिसत आहे असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बारस्कर महाराजांना धमकी! ‘या’ पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर। नगर सहयाद्री- मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी गंभीर आरोप करणारे अजय...

महापालिकेत ‘तो’ ठराव मंजूर? ‘अहमदनगरचं नाव आता अहिल्यानगर’

अहमदनगर। नगर सहयाद्री- नगरकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.अहमदनगर जिल्ह्याचं नाव आता पुण्यश्लोक अहिल्याबाई...

Rain Update: पुढील ४८ तासांत मुसळधार! महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट

मुंबई। नगर सहयाद्री- जानेवारी ते मार्च या हंगामात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शयता भारतीय...

आजचे राशी भविष्य ! तुमच्या राशींसाठी कसा आहे ‘शनिवार’?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आज तुम्हाला मिळालेल्या मोकळ्या वेळेचा फायदा घ्या आणि...