मुंबई । नगर सहयाद्री –
राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली दिली होती. तसेच मोसमी पावसासाठी पोषक हवामान तयार झाल्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भामध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यामध्ये सापेक्ष आर्द्रता वाढली आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह चांगलेच बळकट होत आहेत. त्यामुळे मॉन्सूनसाठी पोषक असं हवामान तयार होत आहे.
आजपासून मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भामध्ये वादळी वारे, विजांसह पूर्वमोसमी पावसासाठी यलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. विदर्भ सोडून बहुतांश भागात कमाल तापमान ४० अंशांपेक्षा कमी आहे.
विदर्भामध्ये पावसामुळे तापमाना कमी होण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये देखील पावसाने हजेरी लावली आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली होती.