spot_img
ब्रेकिंगपावसाचा हाहाकार! घरे, रस्ता पाण्याखाली, मुख्यमंत्र्यानी प्रशासनाला दिले 'हे' आदेश

पावसाचा हाहाकार! घरे, रस्ता पाण्याखाली, मुख्यमंत्र्यानी प्रशासनाला दिले ‘हे’ आदेश

spot_img

पुणे | नगर सह्याद्री:-
पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. बुधवारी रात्रपासून शहरात पाण्याचे तांडव सुरु आहे. पावसाच्या या हाहा:कारामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातील सिंहगड रोडसह नदीकाठच्या भागांमध्ये लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. नदीपात्रात स्टॉल्स काढण्यासाठी गेलेल्या तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरफच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान हवामान विभागाने मुंबई, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, रत्नागिरी, सांगली, हिंगोली, परभणी, लातूरसह कोकण आणि मध्यमहाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अदांज वर्तविण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मावळमधील कुंडदेवी मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे. मावळ तालुयात तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वच नदी नाले ओसंडून वाहत आहेत. पुणे महानगरपालिकेने ८ बोटी आणि बचाव पथके मदातकार्यासाठी नियुक्त केल्या आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांना खाद्य पदार्थ व पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्याच्या जिल्हाधिकार्‍यांच्या सूचना केल्या आहेत.

दरम्यान खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्गाचा जोर आणखी वाढणार आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनला सतर्कतेचा आदेश दिले आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील बोललो आहे. मी स्वत: या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. लोकांची खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

पाणी जाण्यासाठी जागाच ठेवली नाही
नद्यांच्या पात्रांजवळ जास्त पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते, मेट्रोची काम झालीत, यावेळी नाल्याचे प्लॅनिंगच नाही झाले मी नेहमी सांगत आहे. पाणी जाण्यासाठी कोठेच जागा ठेवली नाही. विकास कामाच्याबाबतीत हलगर्जीपणा नको. गेले अनेक वर्षे प्रशासनाकडून इन्फ्रास्ट्रचरची काम झालेली आहे, त्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडला जातोय, अशी टीका खा.सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा-
आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूरसह नगरला अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा एकदा महापुराची टांगती तलवार आहे. पंचगंगा नदीने धोका पातळी गाठल्याने कोल्हापूरकर पुन्हा एकदा धास्तावले आहेत. पंचगंगा नदीची धोका पातळी ४३ फूट १ इंचांवर गेली आहे. त्यामुळे आता जितकी पाण्याची पातळी वाढत जाईल तितकं पाणी कोल्हापूर शहराच्या आणि महामार्गावर सुद्धा येण्याची शयता आहे. त्यामुळे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरु आहेत. पुरग्रस्त भागातून स्थलांतर सुरु करण्यात आले आहे.

नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रेस्यू बोटी
पुण्यात रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. नागरिकांना सुखरुप घरातून बाहेर काढण्यासाठी रेस्यू बोटीच्या सहाय्याने बचाव कार्य सुरू आहे. अनेक रस्ते, सोसायट्या पाण्याखाली गेल्या असून वाहने देखील पूर्ण पाण्यात वाहून गेली.

पुण्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला असून मुळशी आणि मावळ तालुयातील सर्व पर्यटनेस्थळांना पुढील ५ दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाने याबाबत आदेश दिला असून या दोन्ही तालुयात धरण व नदी परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. २९ तारखेपर्यंत सकाळी ८ पर्यंत ही पर्यटनस्थळे बंद राहणार आहेत.

प्रशासन अलर्ट मोडवर
मुंबई, पुणे, रायगड इथे जास्त पाऊस पडतोय. सर्व प्रशासनाला सकाळपासून सूचना केल्या आहेत. अर्लट मोडवर राहून प्रशासनाला लोकांना मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. धरण, कॅचमेंट एरियात खूप पाऊस झाला. त्याचा डबल फटका बसला. लष्कर, नौदल एअर फोर्सची बचाव पथकं सज्ज आहेत. गरजेनुसार लगेच पावल उचलली जातायत. आपातकालीन परिस्थिती ओढवली, तर लोकांना एअरलिफ्ट केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पे अँड पार्कवरुन वादावादी!; किरण काळे म्हणाले, मागे घ्या, अन्यथा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शुक्रवारी सकाळची वेळ. सकाळीच नागरिकांमध्ये आणि मनपाचे कर्मचारी असल्याचे म्हणत पे...

आमदार जगताप यांचा शहरात सत्कार; म्हणाले, हिरवी वळवळ थांबवायची असेल तर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री लोकसभेच्या निवडणुकीत जातीत माणसे विभागली गेली होती. निवडणुकीच्या निकालानंतर सर्वत्र हिरवा...

१०४ ग्रॅम सोन्यावर डल्ला; प्रोफेसर चौकातील प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सोन्याचे दागिने तयार व दुरूस्ती करण्यासाठी दिलेले आठ लाख 30 हजाराचे...

भीषण स्फोटाने भंडारा हादरलं! ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट भंडारा | नगर सह्याद्री:- भंडाऱ्यामध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची...