spot_img
महाराष्ट्रआरक्षणाबाबत शरद पवारांना जाब विचारावा? मंत्री विखे पाटलांचा जरांगे पाटलांना सवाल

आरक्षणाबाबत शरद पवारांना जाब विचारावा? मंत्री विखे पाटलांचा जरांगे पाटलांना सवाल

spot_img

अकोले | नगर सह्याद्री:-
मराठा आरक्षणासाठी लढा देणार्‍या मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे.मनोज जरांगे यांनी हिंगोलीतून शांतता रॅलीला सुरुवात केली होती. या शांतता रॅलीचा पहिला टप्पा पार पडला असून आता लवकरच दुसर्‍या टप्प्याला सुरुवात होत आहे. दुसर्‍या टप्प्यात ते सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रश्न विचारला असत, मनोज जरांगे यांचे स्वागत करतो. मात्र, मराठा आरक्षणाबाबत जरांगे हे शरद पवारांना प्रश्न का ? विचारत नाहीत, असा सवालही उपस्थित केला आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे अकोल्यात जिल्हा नियोजन मंडळाची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेवरही त्यांनी भूमिका मांडली. तर, मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीच्या दुसर्‍या टप्प्यातील दौर्‍यावरही भाष्य केले. कोणी दौरा करावा करावा नाही या संदर्भात स्वतंत्र आहे, जरांगे पाटील इकडे येत असतील तर स्वागत आहे.

माझी जरांगे पाटलांना विनंती आहे, त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मराठा आरक्षणाचा प्रश्न केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मार्गी लागला आहे. नंतर सरकार बदलल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी झोपा काढल्या. तरीही, पुन्हा सरकार आल्यानंतर आम्ही १० टक्के आरक्षण देण्याचा ठराव केला, तो टिकला आहे, त्याला कोणत्याही न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही, असे विखे पाटील यांनी म्हटले.

जरांगे पाटील सातत्याने देवेंद्र फडणवीसांवर आरोप का करतात हे कळत नाही. चार वेळा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार यांना, मी का आरक्षण देऊ शकलो नाही, याबद्दल जरांगेंनी जाब विचारावा. केवळ एका व्यक्तीला टार्गेट करून चालणार नाही, देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेचे त्यांनी स्वागत करायला पाहिजे होेते, असेही विखे पाटील यांनी म्हटले. ज्यांनी आरक्षण दिले नाही, मला आरक्षण मान्य नाही, असे विधान पवार साहेबांनी केले आहे.

१९९४ मध्ये जो काही निर्णय झाला, आरक्षणाच्या बाबतीत चुप्पी साधायची भूमिका स्पष्ट करायची नाही. महाविकास आघाडीतील एकही नेता उद्धव ठाकरेंसह आरक्षणावर बोलायला तयार नाही, त्यांना राजकारण करायचे आहे, त्यांची भूमिका स्पष्ट आहे. आरक्षण देण्यासाठी आम्ही बांधील आहोत आमची भूमिका स्पष्ट केली, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मुद्दयावरुन मनोज जरांगे यांना लक्ष्य केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवेंद्रजी, नगरमध्ये बीडीओच लाचखोर निघाला हो!

मिनी मंत्रालय झाले अधिकाऱ्यांचे चरण्याचे कुरण | आनंद भंडारी यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा परिषद- पंचायत...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार बिनव्याजी कर्ज..

मुंबई । नगर सहयाद्री राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना मोठा दिलासा...

केडगावात विजेचा लपंडाव! माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिला इशारा; ‌‘वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा… ’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री केडगाव उपनगराचा गेल्या एक महिन्यापासून विजेचा लपंडाव चालू असल्यामुळे सर्वत्र अंधाराचे...

चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटींग! निळवंडेत ३६ टक्के तर भंडारदरा धरणात ‘इतका’ पाणीसाठा

अकोले | नगर सह्याद्री भंडारदरा धरण परिसरात गत चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने...