spot_img
महाराष्ट्रPUNE : पुण्यात सराफा व्यावसायिकावर झाडल्या ६ गोळ्या, दागिने लुटले

PUNE : पुण्यात सराफा व्यावसायिकावर झाडल्या ६ गोळ्या, दागिने लुटले

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : ऐन दिवाळीत सोने चांदी लुटण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. काही घटना ताजा असतानाच आता दुकानातील सोने चांदी घेऊन घरी जाणाऱ्या सराफावर गोळीबार करत लुटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हा प्रकार बुधवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान वानवडीतील बी.टी.कवडे रोडवर घडला. प्रदीप मदनलाल ओसवाल (वय ३५) असे हल्ला झालेल्या सराफाचे नाव आहे. त्याच्या पायाला दोन आणि तोंडाला एक गोळी लागली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

प्रदीप ओसवाल यांचे हडपसरमधील सय्यदनगरमध्ये सराफी दुकान असून दिवाळी असल्याने त्यांनी दुकानात मोठ्या प्रमाणावर दागिने ठेवले आहेत. ते दुकान बंद करुन दुचाकीवरुन घरी जात असताना बी. टी. कवडे रोडवर त्यांना हल्लेखोरांनी अडविले. त्यांच्यावर एका पाठोपाठ एक सहा गोळ्या झाडल्या.

त्यातील तीन गोळ्या त्यांना लागल्या. त्यांच्याजवळील दागिने असलेली बॅग चोरट्यांनी हिसकावून ते पळून गेले. गोळीबाराचा आवाज ऐकून नागरिकांनी तिकडे धाव घेतली. ओसवाल यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...

ग्रामपंचायत अधिकारी पठाण यांच्यावर हल्ला! ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा काम बंदचा इशारा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती शकीला पठाण...