spot_img
ब्रेकिंग'गोरगरिबांसाठी घेतलेला सरकारचा निर्णय कौतुकास्पद'

‘गोरगरिबांसाठी घेतलेला सरकारचा निर्णय कौतुकास्पद’

spot_img

नगर शहर व भिंगार मध्ये सरकारच्या वतीने दीपावली निमित्त आ. जगताप यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप

अहमदनगर | नगर सह्याद्री

दिवाळी सण म्हणजे प्रत्येकाच्या घरात आनंदाचे उत्साहाचे वातावरण असते. यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकाची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्य सरकारच्या वतीने आनंदाचा शिधा वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला असून नगर शहर व भिंगार येथील नागरिकांना या योजनेतील शिधा वाटप करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा महायुतीच्या सरकारने सर्वसामान्य कुटुंबाची दिवाळी गोड करण्याचे काम केले आहे. आनंदाचा शिधा वाटप योजना केवळ दिवाळी पुरतीच न राहता वर्षभर ही योजना राबवण्यात यावी यासाठी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी करणार आहे. कार्यकर्त्यांनी देखील शासनाच्या योजनांची जनजागृती नागरिकांपर्यंत करावी सर्वसामान्य जनतेची दीपावली गोड व्हावी यासाठी सरकारने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

नगर शहर व भिंगार मध्ये सरकारच्या वतीने दीपावली निमित्त आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले,यावेळी उपमहापौर गणेश भोसले, राजाभाऊ कोठारी, प्रा. माणिकराव विधाते, नगरसेविका रुपाली वारे. नगरसेविका संध्या पवार. अजिंय बोरकर, प्रकाश हापसे, संजय सानप, संजय सपकाळ, सिद्धार्थ आढाव, सागर चवंडके , अजिंय भिंगारदिवे, बाळासाहेब दिघे, विद्या बेल्हे, गणेश बार्शीकर, दीपक राहिंज, सोनू भंडारी. अक्षय नागापुरे, मारुती पवार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

राजाभाऊ कोठारी म्हणाले की, राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजनेच्या माध्यमातून सर्व सामान्यांची दिवाळी गोड करण्याचे काम केले आहे. सरकारच्या या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे ते म्हणाले.

स्वस्त धान्य दुकानांत आनंदाचा शिधा वाटप

राज्य सरकारच्या वतीने दीपावली निमित्त स्वस्त धान्य दुकानांमध्ये आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रम सुरू झाला आहे. शिधापत्रिका धारकांना शंभर रुपयांमध्ये एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल अर्धा किलो चणाडाळ, अर्धा किलो रवा, अर्धा किलो मैदा, अर्धा किलो पोहे, आदी खाद्य वस्तू मिळणार असल्याचे उपमहापौर गणेश भोसले यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...