spot_img
अहमदनगर'प्रॉपर्टी एक्स्पो'मुळे सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती होण्यास हातभार : आमदार संग्राम जगताप

‘प्रॉपर्टी एक्स्पो’मुळे सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती होण्यास हातभार : आमदार संग्राम जगताप

spot_img

नगरमध्ये क्रेडाई मेगा प्रॉपर्टी एक्स्पो 2024 चे शानदार उद्घाटन
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
सर्वसामान्यांपासून प्रत्येकालाच स्वतःच्या हक्काच्या घराची इच्छा असते. आयुष्यभर काबाडकष्ट करून कमावलेली रक्कम देऊन स्वप्नातील घर घेतले जाते. अशा वेळी त्यांना विश्वसनीय, गुणवत्ता असलेली घरे क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो मुळे एकाच छताखाली पहायला मिळतात.आज नगर शहर चारही बाजूंनी विस्तारत आहे. मजबूत रस्त्यांचे जाळे तसेच अन्य पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने बांधकाम वाढली आहेत. सुरक्षित व व्यवसाय उद्योग स्नेही वातावरणामुळे बाहेरचे बांधकाम व्यावसायिकही नगरमध्ये मोठे प्रकल्प साकारत आहेत. क्रेडाई अहमदनगरने सातत्याने प्रॉपर्टी एक्स्पो आयोजित करून अनेकांच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्तीत योगदान दिले आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

नगरमधील बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संघटनेच्या अहमदनगर शाखेने आयोजित केलेल्या क्रेडाई मेगा प्रॉपर्टी एक्स्पो 2024 चे शुक्रवारी सायंकाळी सावेडी रस्त्यावरील सारडा महाविद्यालयाच्या प्रशस्त जागेत आ. जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, सह सचिव आशिष पोखर्णा, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या होम लोन चिफ मॅनेजर भूमीजा रावत, क्रेडाई अहमदनगरचे अध्यक्ष अमित मुथा, सचिव प्रसाद आंधळे, क्रेडाई अहमदनगरचे प्रेसिडेंट इलेक्ट गिरीश अग्रवाल, उपाध्यक्ष अमित वाघमारे व सागर गांधी, खजिनदार दीपक बांगर, माजी अध्यक्ष संजय गुगळे, विक्रम जोशी, आर्किटेक्ट मयुर कोठारी, प्रकाश मेहता, कमलेश झंवर, ॲड.जयवंत भापकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक करताना अमित मुथा यांनी सांगितले की, दि. 20 ऑक्टोबर पर्यंत सदर प्रदर्शन चालू असणार आहे. 150 हून अधिक स्टॉल्स असून प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. यात प्रथितयश बिल्डर्स व डेव्हलपर्सचे सुमारे 40 स्टॉल तसेच बँक्स, होम फायनान्स कंपनी, बांधकाम मटेरियल ट्रेडर्स आहेत. सदर प्रदर्शनाला मिळणारा प्रतिसाद प्रत्येकवेळी विक्रमी ठरत आहे. रेरा नोंदणीकृत प्रकल्प एकाच छताखाली असल्याने ग्राहकांना साधकबाधक विचार करून निवडीला भरपूर वाव आहे. नगरकरांनी प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन हक्काच्या घराचे स्वप्न साकारावे असे आवाहन त्यांनी केले.

प्रमोद खैरनार म्हणाले, क्रेडाईच्या नगरच्या टिमचे काम अतिशय नियोजनबध्द असते. प्रॉपर्टी एक्स्पोमधून त्याची प्रचीती येते. नगर शहराला व्हिजनरी नेतृत्व लाभल्याने खूप सकारात्मक बदल होत आहेत. व्यापार, उद्योग, व्यवसाय बहरत आहे. परिणामी रियल इस्टेट क्षेत्रही मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे.

भूमिजा रावत म्हणाल्या, क्रेडाईने ग्राहकांसाठी एकाच छताखाली दर्जेदार गृहप्रकल्प आणून निवडीला भरपूर वाव देण्याचे काम केले आहे. अशा उपक्रमांमुळे ग्राहकांचा चांगला फायदा होतो. स्टेट बँक भविष्यातही अशा उपक्रमांना सहकार्य करेल.

आशिष पोखर्णा म्हणाले, अनेकांच्या प्रयत्नातून नगरचा चेहरामोहरा बदलत आहे. नवीन स्कायलाईन तयार होत आहे. काही लाखांपासून ते दोन तीन कोटीपर्यंतचे घरं, प्लॉट याठिकाणी आहेत. याठिकाणी भेट दिल्यावर प्रत्येकाला नगरचे नवीन रूप नक्कीच पहायला मिळेल.

प्रदर्शनात पुण्यातील निवडक बिल्डर्सचेही प्रकल्पही याठिकाणी आहेत. त्यामुळे पुण्यातील प्रकल्पांतही नगरकरांना खरेदी करता येणार आहे. तीन दिवसीय प्रदर्शनात दररोज लकी ड्रॉ काढण्यात येणार असून प्रदर्शनास भेट देणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी असेल. याशिवाय विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, फूड कोर्ट असल्याने ग्राहकांना सहकुटुंब निवांत वातावरणात आपल्या आवडीनुसार घराचे बुकिंग करता येणार आहे. प्रदर्शनस्थळी बँका, गृह कर्ज देणाऱ्या फायनान्स कंपन्यांचे स्टॉल्सही आहेत. बजेट होम, लक्झुरियस घरे, व्टिन बंगलो, अपार्टमेंट, अंतिम मंजुरीचे प्लॉट ले आऊट, कमिर्शियल कॉम्प्लेक्सचे प्राजेक्ट, फार्म हाऊस, एन.ए. प्लॉट एकाच छताखाली उपलब्ध आहेत. याशिवाय प्रथमच बांधकाम मटेरियल सप्लायर्स व बांधकामाशी निगडित लिफ्ट, स्टील, इंटेरियर मटेरियलचेही स्टॉल प्रदर्शनात आहेत. 10 लाखापासून ते 3.50 कोटींपर्यंतची घरे, फ्लॅटचे प्रोजेक्ट याठिकाणी आहे. अतिशय योग्य व रास्त दरात पारदर्शी व्यवहारासह दर्जेदार, स्वप्नातील घराच्या पूर्ततेचा आनंद या प्रदर्शनातून ग्राहकांना मिळत आहे. कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद आंधळे यांनी आभार मानले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विधानसभेच्या अनुषंगाने हाकेंचं जरांगेंवर टीकास्त्र; म्हणाले, ‘मनोज जरांगेंची…’

पंढरपूर / नगर सह्याद्री - मराठा आंदोलनक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी...

मोठी बातमी ! ‘लाडकी बहीण योजनेला’ स्थगिती, निधीही थांबवला; समोर आले कारण..

मुंबई / नगर सह्याद्री - राज्य सरकारची महत्त्वकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही...

नगरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले; कोण आहेत उमेदवार पहा…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री विधानसभा निवडणुकीसाठी धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास...

कुंटणखान्यावर छापा; प्रतिष्ठित व्यक्तींवर गुन्हा, नेमकं काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्ह्यातील राहुरी येथील न्यू भरत हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी वेश्या व्यवसायात...