spot_img
ब्रेकिंगराजकीय भूकंपाचे संकेत? पंतप्रधान मोदी यांचा दौरा, गृहमंत्री शिंदे यांना निमंत्रण, 'त्या'...

राजकीय भूकंपाचे संकेत? पंतप्रधान मोदी यांचा दौरा, गृहमंत्री शिंदे यांना निमंत्रण, ‘त्या’ गौप्यस्फोटामुळे…

spot_img

सोलापूर| नगर सह्याद्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सोलापूर दौर्‍यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे. याच दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे काँग्रेस नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहेत.

सोलापुरात होणार्‍या नाट्य संमेलनाच्या उदघाटनासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना ते निमंत्रण देणार आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील काँग्रेच्या ज्येष्ठ नेत्याची भेट घेत असल्याने सोलापुरात चर्चेला उधाण आले आहे. मंगळवारी रात्री अक्कलकोट तालुयातील चपळगाव गावात एका छोटेखानी कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपकडून मला ऑफर होती, असा गौप्यस्फोट केल्याने राजकीय विश्लेषकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

पालकमंत्री पाटील बुधवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत हेलिकॉप्टरने कुंभारी येथील रे नगर या ठिकाणी जाणार आहेत. सायंकाळी पाचच्या सुमारास काँग्रेस नेते शिंदे यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी ते जाणार आहेत. सोलापुरात होणार्‍या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण ते देणार आहेत.

आगामी लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार अद्याप निश्चित नाही. भाजपच्या काही नेत्यांनी शिंदे यांना भाजपमध्ये घेण्यासाठी यापूर्वी प्रयत्न केल्याचेही ऐकण्यास मिळते. याच पार्श्वभूमीवर ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. मंगळवारी रात्री शिंदे यांनी गौप्यस्फोट केल्याच्या पार्श्वभूमीवरही या भेटीला महत्त्व देण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांसाठी दिलासादायक बातमी!; ‘त्या’ यादीत आपले नाव आहे का? ते पाहा…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री;- नगर अर्बन बँकेत पाच लाखाहून अधिक रकमेच्या ठेवी अडकलेल्या ठेवीदारांना निम्मी...

आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी; ‘दो दिन के अंदर…’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार संग्राम जगताप यांना बुधवारी रात्री...

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशींसाठी ‘गुरुवार’ कसा? पहा..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...

‘स्थानिक स्वराज्य’ संस्थांच्या निवडणुकीबाबत मंत्री विखे पाटलांचे महत्वाचे स्टेटमेंट; लवकरच..

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लवकरच; प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाणांना दिल्या शुभेच्छा   शिर्डी । नगर सहयाद्री  पंतप्रधान नरेंद्र मोदी...