अहमदनगर| नगर सह्याद्री
आगामी लोकसभा निवडणूक कामकाजाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध येणार्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या व नेमणुका मंगळवारी करण्यात आल्या. १७ पोलीस निरीक्षक व सात सहायक पोलीस निरीक्षक अशा २४ पोलीस अधिकार्यांच्या बदल्याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले.
नगर शहरातील कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी, भिंगार कॅम्प यासह श्रीरामपूर शहर, राहुरी, आश्वी, शनिशिंगणापूर, अकोले, कोपरगाव तालुका, शिर्डी, सोनई, राहाता, लोणी, पारनेर, सुपा, राजुर, बेलवंडी या पोलीस ठाण्यांना नवीन प्रभारी अधिकारी मिळाले आहेत. मंगळवारी पोलीस अधीक्षक ओला यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक झाली. यात बदल्याबाबत निर्णय घेतला.
बदली झालेले पोलीस अधिकारी (कंसात सध्याचे नेमणुकीचे ठिकाण व नवीन नेमणुकीचे ठिकाण) पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड (पारनेर ते आर्थिक गुन्हे शाखा), ज्योती गडकरी (सुपा ते नियंत्रण कक्ष), विजय करे (अकोले ते जिल्हा विशेष शाखा), प्रताप दराडे (जिल्हा विशेष शाखा ते कोतवाली), अरूण आव्हाड (आर्थिक गुन्हे शाखा ते सुपा), संजय ठेंगे (बेलवंडी ते राहुरी), संजय सोनवणे (राहुरी ते आश्वी), अशोक भवड (मानवसंसाधन ते शनिशिंगणापूर), संतोष भंडारे (आश्वी ते बेलवंडी), गुलाबराव पाटील (वाहतूक शाखा शिर्डी ते अकोले), नितीनकुमार चव्हाण (नियंत्रण कक्ष ते वाचक पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय), आनंद कोकरे (नव्याने हजर ते तोफखाना), नितीन देशमुख (नव्याने हजर ते श्रीरामपूर शहर), सतीष घोटेकर (नव्याने हजर ते मानवसंसाधन), समीर बारावकर (बदली आदेशाधीन ते पारनेर), संदीप कोळी (बदली आदेशाधीन ते कोपरगाव तालुका), रामकृष्ण कुंभार (बदली आदेशाधीन ते शिर्डी), सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू (पाथर्डी ते भिंगार कॅम्प), माणिक चौधरी (सोनई ते एमआयडीसी), आशिष शेळके (शेवगाव ते सोनई), कैलास वाघ (राहाता ते लोणी), युवराज आठरे (लोणी ते सायबर), दीपक सरोदे (शेवगाव ते राजूर), रामचंद्र कर्पे (सोनई ते भरोसा सेल).
दरम्यान जिल्ह्यातील आणखी काही पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची बदली करण्यात येणार असून विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी नाशिक परिक्षेत्रातील बदल्या केल्यानंतर या जिल्ह्यांतर्गत बदल्या केल्या जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक ओला यांनी सांगितले.