spot_img
देशपंतप्रधान मोदींच्या खात्यात आहेत फक्त 574 रुपये ! कसलाही पगार घेत...

पंतप्रधान मोदींच्या खात्यात आहेत फक्त 574 रुपये ! कसलाही पगार घेत नाहीत, पहा मोदींची एकूण श्रीमंती

spot_img

नगर सह्याद्री टीम : आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आता जगभरात कुणाला माहिती नाही असे कुणी सापडणार नाही. त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने आपला मोठा ठसा उमटवला आहे.

सध्या अनेकांना प्रश्न पडतो की मोदी हे पंतप्रधान आहेत तर मग त्यांचा पगार किती ? त्यांच्याखे किती रुपयांची इस्टेट आहे ? तर येथे आपण त्याबद्दल माहिती पाहू. पंतप्रधान मोदी हे कसलाही पगार घेत नाहीत. होय हे खरे आहे. एका रिपोर्टनुसार ते संपूर्ण रक्कम दान करतात.

पंतप्रधानांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. यानुसार, कुठल्याही प्रकारची जीवन विमा पॉलिसी त्यांच्याकडे नाही असे दिसते, त्यांची विमा पॉलिसी मॅच्युअर होऊन यातून जे काही पैसे मिळाले, ते त्यांनी आपल्या एफडी खात्यात जमा केले असावेत असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

संपत्तीबाबतच्या नव्या घोषणेनुसार, पंतप्रधान मोदींच्या या वर्षाच्या 31 मार्चपर्यंत एसबीआय गांधीनगर शाखेतील एफडी खात्यात 2.47 कोटी रुपये होते. गेल्या वर्षभरात या खात्यात 37 लाख रुपयांची वाढ झाली आहे. मोदी यांचे फक्त एसबीआय गांधीनगर शाखेत खाते आहे. दुसरे कोणतेही त्यांचे खाते नाही.

मोदींवर कसलेही कर्ज नाही, वाहन नाही आणि जमीनही नाही. त्यांच्याकडे २० हजार रुपयांचे बॉण्ड होते. बँक बॅलन्सबद्दल बोलायचे झाले तर पीएम मोदींकडे फक्त 574 रुपये आहेत.

यावर्षी 31 मार्चपर्यंत त्यांच्याकडे 30 हजार 240 रुपयांची रोकड होती. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान मोदींसह मोदी सर्व केंद्रीय मंत्री त्यांची आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची संपत्ती आणि कर्ज हे स्वेच्छेने घोषित करत असतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...