spot_img
अहमदनगरAhmednagar : नगरजवळ ग्रीन हिल स्टेडियम उभारणार , आमदार नीलेश लंके यांची...

Ahmednagar : नगरजवळ ग्रीन हिल स्टेडियम उभारणार , आमदार नीलेश लंके यांची मोठी घोषणा

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : नगर तालुक्यात क्रिकेटची मोठी क्रेझ आहे. अनेक टूर्नामेंट मॅच तालुक्यात सुरु असतात. त्यामुळे या क्रीडाप्रेमींसाठी लवकरच निंबळक याठिकाणी एक कोटी रुपये किंमतीचे ग्रीन हिल स्टेडियम आपण उभारू अशी घोषणा आ. नीलेश लंके यांनी केली.

कै. संजय लामखडे व कै. विलासराव लामखडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नगर तालुक्यातील निंबळक येथे याचे आयोजन होते.

या स्पर्धच्या उद्घाटन प्रसंगी आ. लंके यांनी वरील घोषणा केली. दोस्ती क्रिकेट क्लबतर्फे गेल्या ३०-३५ वर्षांपासून निंबळक येथे दिवाळीत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. येथील मैदान खेळाडूंसाठी चांगले आहे. या स्पर्धेत जिल्हाभरातून संघ सहभागी होतात. खेळाडूंची गैरसोय होत असल्याने अजय लामखडे यांनी येथे स्टेडियमची मागणी केली होती.

या स्टेडियमसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. स्टेडियमच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे असेही आ. लंके यांनी सांगितले.

निंबळक येथील क्रिकेट स्पर्धात 60 संघानी सहभाग घेतला आहे. या स्पधेत प्रथम क्रमांक मिळवणार्‍या संघाला 55 हजार 555 रुपयांचे रोख व चषक, उपविजेतेपद मिळवणार्‍या संघाला 44 हजार 444 रुपयांचे रोख व चषक असे बक्षीस देण्यात येणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अभिनेत्री कंगनाची पोस्ट चर्चेत, महिलांना पुरुषांची गरज पण…

मुंबई। नगर सहयाद्री अभिनेत्री कंगना रनौत कायम चर्चेत असते. आता देखील तिने एक पोस्ट शेअर...

काका अजित पवारांचा पुतण्या रोहित पवारांवर मोठा राजकीय वार ! घणाघाती टीका

कर्जत / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत सरकारमध्ये...

सोने खरेदी करताना बिलाचे महत्व काय? खरे बिल कसे असावे? जाणून घ्या

नगर सह्याद्री टीम : सोन्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. गुंतवणुकीसाठी अनेक लोक सोने खरेदी...

शेतकऱ्यांना मालामाल करेल ‘ही’ वनस्पती, शेकडो महिलांनी कमवलेत लाखो रुपये

नगर सह्याद्री टीम : Lemongrass Farming : प्रत्येकाला कमी खर्चात चांगला नफा मिळवायचा असतो आणि...