spot_img
अहमदनगरअहिल्यानगर मनपाकडून प्रधानमंत्री आवास योजना; आयुक्त म्हणाले भाडे तत्वावर घरकुले..

अहिल्यानगर मनपाकडून प्रधानमंत्री आवास योजना; आयुक्त म्हणाले भाडे तत्वावर घरकुले..

spot_img

परवडणाऱ्या किंमतीत सर्वांसाठी घरकुले उभारणार, भाडे तत्वावरही घरकुले उपलब्ध करणार / आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती

अहिल्यानगर/ नगर सह्याद्री –
शहरात शासननिणर्यानुसार प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) २.० राबविण्यात येत आहे. “प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत चार घटकांचा समावेश असून नागरिकांना परवडणाऱ्या किंमतीत घरकुले उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्वतःच्या जागेत घर बांधण्यासाठीही अनुदान उपलब्ध होणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे सोबत घेवून महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागात संपर्क साधून अर्ज करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व्यक्तीगत स्वरुपात घरकुल बांधण्यास अनुदान, भागीदारी तत्वावर परवडणा-या घरांची निर्मिती, भाडेतत्वावर परवडणा-या घरांची निर्मिती, व्याज अनुदान योजना अशा चार घटकांतर्गत प्रकल्प राबवण्यात येणार आहे. अहिल्यानगर महानगरपालिका हददीतील नागरिकांना अर्ज भरण्याकरता प्रकल्प विभाग, शहरस्तरीय तांत्रिक कक्ष, (CLTC) प्रधानमंत्री आवास योजना, नविन प्रशासकिय इमारत, छत्रपती संभाजीनगर रोड, अहिल्यानगर महानगरपालिका येथे सुविधा उपलब्ध आहे. संबंधित घटकातील योजनेचे युनिफाईड वेब पोर्टलवरील लाभार्थी यांनी स्वतः उपस्थित राहून फॉर्म, भरून मनपात नोंदणी करणे आवश्यक आहे, असे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

योजनेत पात्र होण्यासाठी निकष पुढील प्रमाणे – १. लाभार्थी कुटूंबामध्ये पती-पत्नी व अविवाहित (वय वर्ष १८ वरील) मुले/मुली यांचा समावेश असेल. २. या योजने अंतर्गत अनुदान/सहाय्य प्राप्त करुन घेण्याकरिता शहरी भागात राहणा-या EWS/LIG/MIG कुटूंबातील कोणत्याही सदस्यांच्या नावावर देशाच्या कोणत्याही भागात पक्के घर नसावे. ३. लाभार्थ्याने गेल्या २० वर्षात कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. ४. योजने अंतर्गत बांधण्यात येणारी घरे कुटूंबातील कर्त्यामहिलेच्या किवा कर्त्या पुरुष व महिला यांचे संयुक्त नावावर असतील. ५. आर्थिक दुर्बल घटकांसाठी ३ लक्ष इतकी कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा राहील. (अर्जदाराचा चालू वर्षाचा तहसिलदार यांचे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.) ६. स्वतःच्या नावाने व कुटूंबातील आधारकार्ड लिंक असलेले बँक खाते (बँक पासबुक) असावे. ७. जात प्रमाणपत्र (SC, ST किंवा OBC) लाभार्थीसाठी आवश्यक आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वाळू तस्करीतून पारनेरमध्ये गुन्हेगारीचा कहर; पोलिसांची गुन्हेगारांसोबत पार्टनरशिप?

भ्रष्ट पोलिसांच्या आश्रयाने गुन्हेगार बिनधास्त! वाळू तस्करीच्या वादात युवकाला मारहाण, फक्त एकाला अटक; पोलिसांची...

हार्दिकला मोठा झटका, शुभमन गिलकडे मोठी जबाबदारी

आशिया कपसाठी सूर्याच्या शिलेदारांची निवड नगर सह्याद्री वेब टीम - आशिया चषकासाठी भारतीय संघाची आज घोषणा...

बंदुकीच्या धाकाने पत्नीला मारहाण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड येथील सागर हॉटेलजवळ राहणाऱ्या स्नेहल निखिल शेकडे...

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी, कर्मचारी बेमुदत संपावर; कारण काय?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात सन 2005 पासून कंत्राटी पद्धतीने काम...