spot_img
ब्रेकिंगPolitical News : एकनाथ शिंदे-राज ठाकरे फेब्रुवारीत एकत्र येणार? राजकीय चर्चांना उधाण

Political News : एकनाथ शिंदे-राज ठाकरे फेब्रुवारीत एकत्र येणार? राजकीय चर्चांना उधाण

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री :
Political News Today : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्र येतील अशी चर्चा आहे. राज ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या अलीकडील काळात अनेक भेटी झाल्या. काल पुन्हा एकदा राज ठाकरे हे शिंदे यांच्या भेटीला गेले होते.

जवळपास तासभर त्यांच्यात चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान आता आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना-मनसे फेब्रुवारी महिन्यात एकत्र येतील, हे दोन्ही नेते एकत्र येऊ शकतील असा दावा केला आहे. राज ठाकरे यांनी जाहीर भाषणात आणि पत्रकार परिषदांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या बंडाचं समर्थन केलं होतं.

तर, शिवसेना उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीसोबत गेल्यावरुन टोलाही लगावला होता. दरम्यान मनसे व उद्धव ठाकरे एकत्र येतील असे म्हटले जात होते. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि मनसे एकत्र येईल असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलाय.

राज ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी ‘वर्षा’वर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी राज यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर उपस्थित होते. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दुकाने आणि आस्थापनावरील मराठी भाषेतील पाट्या, टोलनाके, धारावी झोपडपट्टी पुनर्विकास आदी मुद्यांसह सद्य राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे समजते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ईश्वरी तुपे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

  अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक...

शांताराम लंके यांचे सामाजिक कार्य मोठे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

निघोज / नगर सह्याद्री : कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम लंके यांचे सामाजिक कार्य...

दगाफटका केल्यास सरकारचा कार्यक्रमच लावणार; जरांगे पाटील काय म्हणाले पहा…

बीड / नगर सह्याद्री - मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच...

शेअर ट्रेडिंगमध्ये अधिक नफा मिळवून देण्याच्या आमिषाने ५० लाखांची ऑनलाईन फसवणूक

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून...