spot_img
ब्रेकिंगPolitical News : लोकसभेबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांही होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहमत..

Political News : लोकसभेबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांही होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहमत..

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर स्थापन केलेल्या कोविंद समितीला राजकीय पक्षांकडून आतापर्यंत ३५ निवेदने प्राप्त झाली आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र निवडणुका घेण्याचे समर्थन केले आहे.

‘एकत्र निवडणुका घेतल्यास पैशांची बचत होईलच; पण कमी वेळेत निवडणूक प्रक्रिया पार पडेल,’ असे शिंदे यांनी कोविंद समितीला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोरामच्या निवडणुका अलिकडेच झाल्या होत्या.

पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्र, हरियानासह अन्य राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. एकत्रित निवडणुका झाल्यास सर्वच बचत होते, असे शिंदे यांनी म्हटले आहे. ‘एनडीए’ सरकारकडून ज्या महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यात एक देश-एक निवडणुकीचा समावेश आहे. वारंवार निवडणूक होणे अर्थव्यवस्थेसाठी चांगले नाही, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम ‘या’ दिवशी जाहीर होणार?

माय नगर वेब टीम Zilla Parishad Panchayat Samiti Election : येत्या २ डिसेंबर २०२५...

बीड पुन्हा हादरलं; ४ जणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं

बीड / नगर सह्याद्री - बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथे शेतीच्या वादातून चार जणांना...

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव, नेमकं काय केल?

नगर सह्याद्री वेब टीम Sonakshi Sinha : बॉलिवूडची फिटनेस क्वीन अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज अभिनय,...

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...