अहमदनगर | नगर सह्याद्री –
nagar taluka kharedi vikri sangha : नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत नगर तालुका महाविकास आघाडीने मोठा निर्णय घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. कै. माजी खासदार दादापाटील शेळके यांना श्रद्धांजली व संस्थेचे हित लक्षात घेऊन नगर तालुका महाविकास आघाडीने सर्व उमेदवारी अर्ज मागे घेत खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी दिली.
दरम्यान, नगर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध करतांनाच माजी खासदार दादापाटील शेळके यांचे चिरंजीव रावसाहेब पाटील शेळके यांना पुढील पाच वर्ष तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन करावे, वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चांगला कारभार करावा, तोट्यात असलेला संघ नफ्यात आणावा तसेच संघाची कोणतीही जागा विकू नये अशा काही अटी सत्ताधारी गटासमोर ठेवल्या आहेत.
नगर तालुका खरेदी विक्री संघावर गेल्या २० वर्षापासून जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या गटाचे एकहाती वर्चस्व आहे. संघाच्या १७ जागांसाठी ६० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची सोमवार (दि.५) दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटची मुदत होती. दरम्यान माजी खासदार दादापाटील शेळके यांचे चिरंजीव रावसाहेब पाटील शेळके यांच्यासाठी नगर तालुका महाविकास आघाडीने एक पाऊल मागे टाकत स्व. दादापाटील शेळके यांना श्रद्धांजली म्हणून संस्थेचे हित पाहता सर्व उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कै. माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे निधनानंतर नगर तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक २०२३ ते २०२८ ही पहिलीच निवडणूक आहे. माजी खासदार दादा पाटील शेळके यांनी सहकार प्रामाणिकपणे जगवला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे संधी देऊन त्यांना स्वतःच्या मनाप्रमाणे कारभार करण्यास देऊन मोठे केले. परंतु, सध्याच्या निवडणुकीत बहुतांश जुन्या सभासदांना अपात्र केले. तर बुर्हानगर, वारूळवाडी, कापूरवाडी या गावातील ५२१ सभासद वाढवले.
कै. दादा पाटील शेळके यांचे सुपुत्र रावसाहेब पाटील शेळके यांच्याकरिता व माजी खासदार दादापाटील शेळके यांना श्रद्धांजली म्हणून तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय नगर तालुका महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी घेतला. दरम्यान, विरोधकांनी सत्ताधार्यांकडे रावसाहेब पाटील शेळके यांना पुढील पाच वर्ष तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन करावे, त्यांनी वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढील पाच वर्ष चांगला कारभार करावा, सध्या तोट्यात असलेल्या संघ पाच वर्षात नफ्यात आणावा, पाच वर्षात संघाची कुठलीही जागा विकू नये असा चांगला कारभार करावा अशा अटी ठेवल्या आहेत.
कै. दादा पाटील शेळके याच्या हयातीनंतर रावसाहेब पाटील शेळके हे पहिली निवडणूक लढवत आहेत. दादा पाटील शेळके यांना श्रद्धांजली म्हणून ही पहिली व शेवटची निवडणूक त्यांचे पुत्र रावसाहेब पाटील शेळके यांचे करता बिनविरोध करत आहोत. परंतु या पुढील काळात आम्ही त्यांना गृहीत धरणार नाहीत असे नगर तालुका महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष संपतराव म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, शिवसेनेच उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, युवा नेते प्रविण कोकाटे, प्रविण गोरे, नगर तालुकाअध्यक्ष अरुण म्हस्के, साहेबराव बोडखे, नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत, महेंद्र शेळके, गोरख सुपेकर, मारुती लांडगे आदी उपस्थित होते.
नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतील बिनविरोध उमेदवार
सहकारी संस्था प्रतिनिधी – दत्ता नारळे, अशोक कामठे, अजिंक्य नागवडे, संजय धामणे, भारत फलके, संजना पठारे, डॉक्टर राजेंद्र ससे, आसाराम वारुळे, मंगेश बेरड, बाबा काळे,
व्यक्तीगत मतदार संघ – रावसाहेब शेळके, डॉक्टर मिनीनाथ दुसंगे,
माहीला राखीव संघ- मंगल ठोकळ, मीना गुंड,
इतर मागास वर्ग – उत्कर्ष कर्डिले,
अनुसुचित जाती जमाती -जीवन कांबळे,
विमुक्त गाती भटक्या – संतोष पालवे,
जिल्हा खरेदी विक्री संघ बिनविरोध उमेदवार
विलास शिंदे, भीमा भिंगारदिवे, रूपाली सचिन लांडगे