spot_img
अहमदनगरAhmednagar Breaking : भीषण अपघातात पोलीस ठार, दोन गंभीर

Ahmednagar Breaking : भीषण अपघातात पोलीस ठार, दोन गंभीर

spot_img

दोघे गंभीर जखमी ः नगर-कल्याण मार्गावर ढोकी शिवारातील घटना

पारनेर | नगर सह्याद्री-
नगर-कल्याण महामार्गावरील ढोकी शिवारात बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास हॉटेल समर्थ नाष्टा सेंटर समोरील झाडाला स्विफ्ट कार आदळल्याने नारायणगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई महेश तुकाराम काठमोरे यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस कॉन्स्टेबल महेश काठमोरे पाथर्डी तालुयातील शिरपूर येथील असून या स्विफ्ट कारचा चालक साहील करीम हुसेन खान व गणेश सचिन शिंदे (दोघे रा. तिसगाव, ता. पाथर्डी) गंभीर जखमी आहेत. जखमींना नगर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळतात स्थानिकांच्या मदतीने पारनेरचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व सहाय्यक फौजदार संदीप गायकवाड यांनी जखमींना उपचारासाठी हलवले.

यासंबंधी फिर्याद गणेश तुकाराम काठमोरे (वय ३६, रा. शिरापूर) यांनी दिली आहे. नगर-कल्याण रस्त्यावरील हॉटेल समर्थ नाष्टा सेंटरसमोर स्वीफ्ट गाडी नंबर (एमएच १४ जीएस ४२२०) चालक साहील करीम हुसेन खान याने भरधाव चालविल्याने झाडावर जावुन जोरात आदळली. चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले, की माझा लहान भाऊ महेश तुकाराम काठमोरे पोलिस दलात नोकरीस आहे.

१९ डिसेंबरला सुट्टीवर आला होता. २० डिसेंबरला रात्री १० वाजण्याच्या सुमारास परत डयुटीवर जाण्यासाठी मित्र साहील करीम हुसेन खान व गणेश सचिन शिंदे यांच्यासह गावातील वाहीद शेख् यांची स्वीफ्ट कार घेऊऩ नारायणगाव येथे निघाले. २१ डिसेंबरला मध्यराजी १२.०४ च्या सुमारास माझे दाजी अशोक जगन्नाथ तागड (रा. सोनई ता. नेवासा) यांनी फोन करुन सांगितले की, महेश यांचा अपघात झाला असून तो मयत झाला आहे.

मी, माझी पत्नी व माझा चुलत भाऊ अशोक साहेबराव काठमोरे असे आम्ही खासगी वाहनाने टाकळी ढोकेश्वर येथे जात असताना साहील करीम हुसेन खान व गणेश सचिन शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्याकडे अपघाताबाबत विचारपूस केली. महेश काठमोरे पुढील सीटवर होता. हा अपघात चालक साहील खान याच्या चुकीमुळे झालाचे गणेश शिंदे याने सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...