spot_img
ब्रेकिंगविधानसभा निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज! १५ हजार जणांवर होणार प्रतिबंधक कारवाई..

विधानसभा निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज! १५ हजार जणांवर होणार प्रतिबंधक कारवाई..

spot_img

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची माहिती
अ. नगर । नगर सहयाद्री:-
लोकसभा निवडणुकीत पोलिसांनी पकडलेल्या लाखो रूपयांची रकमेचा तपास सुरू असून याबाबतची माहिती आयकर खात्याला कळविण्यात आलेली आहे. निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाची कायदा सुव्यवस्थेची पहिली बैठक झालेली असून लवकरच पुढील नियोजन करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत दाखल गुन्ह्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून रेकॉर्डवरील आरोपींचा शोध सुरू आहे.

जिल्ह्यात निवडणूक काळात अवैध दारू शस्त्रे, तसेच बेकायदा पैशाची वाहतूक करणार्‍यांवर लक्ष ठेवण्यात येणार असून यासाठी आजपासून विधानसभानिहाय भरारी पथके कार्यरत झाली आहेत. निवडणूक काळात पोलीस प्रशासन प्रत्येक गोष्टीवर करडी नजर ठेवणार आहे. यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सहा पथके कार्यरत राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील गुन्हेगार यांच्यावर करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाई यासह पुढील काळात करण्यात येणार्‍या विविध उपायोजना यांची माहिती दिली.

आगामी विधानभेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीतील सुमारे 15 हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिला आहे. तसेच काहीजणांवर तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. तर काहींवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात गुन्हेगार यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...