spot_img
अहमदनगरमोठी बातमी : पारनेरमध्ये अजित पवारांनी टाकला डाव; मातब्बरांचा पक्षात प्रवेश

मोठी बातमी : पारनेरमध्ये अजित पवारांनी टाकला डाव; मातब्बरांचा पक्षात प्रवेश

spot_img

अहिल्यानगर-पारनेर | नगर सह्याद्री:-
पारनेर विधानसभा मतदार संघाच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी उलथापालथ झाली आहे. खासदार नीलेश लंके यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मोठा डाव टाकला आहे. मतदारसंघातील त्यांचे जुने सहकारी अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, बांधकाम समितीचे माजी सभापती काशीनाथ दाते, उद्योजक माधवराव लामखडे, माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्या हतात घड्याळ बांधत लंकेंच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर सुजित झावरे, काशिनाथ दाते, विजय औटी, माधवराव लामखडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्याच्या व तालुक्याच्या राजकारणात मोठा बदल झाला असून खासदार नीलेश लंके यांच्या विरोधात अजित पवार यांनी राजकीय मोर्चे बांधणी करत आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की मी सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आपण सर्वजण एकत्र येऊन पारनेर मध्ये राष्ट्रवादीला बळकटी द्याल असा मला विश्वास आहे. यावेळी प्रवेशा दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, माजी मंत्री अशोकराव सावंत, सचिन पाटील वराळ, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष भास्कर उचाळे, धनगर समाजाचे नेते शिवाजी गुजर आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीकडून विधानसभा लढण्यासाठी सुजीत झावरे, काशिनाथ दाते, माधवराव लामखडे, विजय औटी यांची नावे आघाडीवर आहेत. अजित पवार यांनी सर्वेनुसारच उमेदवार देणार असे सांगितले आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार हे पहावे लागणार आहे.

सर्व्हेनुसार उमेदवार अंतिम करू : अजित पवार
पारनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेकांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे पक्षाला बळकटी मिळाली असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक इच्छुक आहेत परंतु सर्वेनुसारच उमेदवार अंतिम करू असे परखड मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथे व्यक्त केले आहे अशी सूत्रांकडून माहिती समजली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इंजेक्शन जीवावर बेतलं, दोन चिमुरड्यांचा मृत्यू!; ‘या’ हॉस्पिटलमध्ये घडला प्रकार

Butox Injection Death: एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली...

राष्ट्रवादीची ताकद वाढणार; ‘या’ ४ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार?

Politics News: सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. जिल्ह्यातील चार माजी आमदार...

अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार; महिलेच्या बंगल्यावर दरोडा

अकोले | नगर सह्याद्री अकोले शहरातील परवानाधारक देशी दारू विक्रेत्या काशीबाई म्हतारबा डोंगरे (रा.देवठाण रोड...

‘मळगंगा देवीच्या घागर दर्शनासाठी लोटला जनसागर’

निघोज | नगर सह्याद्री राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता....