spot_img
अहमदनगर'प्रति पंढरपूर पळशीत बुधवारी धार्मिक कार्यक्रम'

‘प्रति पंढरपूर पळशीत बुधवारी धार्मिक कार्यक्रम’

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री
तालुक्यातील भाविक भक्तांचे श्रद्धेचे स्थान असलेले प्रति पंढरपूर पळशी या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त भव्य उत्सव सोहळा होत असतो. जिल्ह्यातून राज्यातून तसेच तालुक्यातून विविध भागातून अनेक विठ्ठल भक्त या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी पळशी या तीर्थक्षेत्री येत असतात. पळशी हे तीर्थक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते.

बुधवार दि १७ जुलै रोजी पहाटे दोन वाजल्यापासून संपूर्ण दिवसभर विविध अध्यात्मिक धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पारनेर तालुक्याचे नेते सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते सपत्नीक श्री. विठ्ठल रुक्मिणी च्या मंदिरामध्ये स्नान,अभिषेक, आरती असा महापूजेचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे.

तसेच दिवसभर तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मंगलमय वातावरणामध्ये हा उत्सव सोहळा आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर दरवर्षीप्रमाणे संपन्न होत आहे. सकाळी आरती व पूजा संपन्न झाल्यानंतर सकाळी सात ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना देवस्थान ट्रस्टच्या वतीने चहा व खिचडीचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान प्रति पंढरपूर पळशी या ठिकाणी परिसरातून व जिल्ह्यातून अनेक दिंड्या येत असतात.भाविक या ठिकाणी मंगलमय वातावरणामध्ये भक्ती भावाने या ठिकाणी नेहमी दर्शनासाठी येतात. विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे एक ऐतिहासिक मंदिर आहे. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मिठू जयवंत जाधव यांनी व सर्व विश्वस्त देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ पळशी यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त सर्व भाविक भक्तांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे.

धाकटया पंढरीत भव्य यात्रोत्सव
जामखेड तालुक्यातील धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या धनेगाव येथे आषाढी एकादशीच्या निमित्त भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून पहाटे आमदार रोहित पवार, आमदार प्रा. राम शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, प्रा. सचिन गायवळ, प्रा. मधुकर राळेभात व मंदिर ट्रस्ट यांच्या शुभहस्ते महापुजा करण्यात येणार असल्याची माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भरत काळे यांनी दिली. धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या धनेगाव या ठिकाणी आषाढी एकादशीला मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. तिनशे वर्षांचा इतिहास या मंदिराला आहे. प्रत्येक एकादशीच्या दिवशी या मंदिरात कीर्तन होते. प्रा.मधुकर राळेभात हे देखील आपली दिंडी घेऊन जातात या वर्षीचे त्यांचे अठरावे वर्षे आहे. याच बरोबर जवळका, जेटकेवाडी, तिंत्रज, सह आनेक ठीकाणाहुन आषाढी एकादशी निमित्ताने धाकट्या पंढरीत दिंड्या येत असतात. तसेच अँड डॉ. अरूण जाधव यांचीही संविधान समता दिंडी येते. वारकर्यांनी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी पहाटे पासूनच मोठ्या रांगा असतात. विषेश म्हणजे सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांच्या वतीने खर्डा व परीसरातील वारकर्यांनसाठी दर्शन घेण्यासाठी मोफत बस ची सोय करण्यात येते तसेचग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. या ट्रस्ट चे कायदेशीर सल्लागार म्हणून अँड अनिल काळे, प्रा. मधुकर राळेभात, प्रा. सचिन गायवळ काम पाहत असल्याची माहिती त्यांनी दिली असून धाकटी पंढरी येथे होणार्‍या यात्रोत्सवास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवहन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भरत (बप्पा) काळे, उपाध्यक्ष दत्तात्रय काळे, सचिन काळे, बबनराव भोसले, खजिनदार संतोष काळे, संचालक लक्ष्मण लव्हाळे,जयसिंग जाधव, बाळासाहेब टिपरे, पद्माकर काळे, उत्तम भोसले, हिरालाल देशमुख, गणेश काळे, महादेव जाधव, बाळासाहेब पौळ, (अचारी), हरीभाऊ टीपरे, लक्ष्मण जाधव, रघुनाथ उंबरे, शिवाजी भोळे, शहाजी टीपरे यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...