spot_img
अहमदनगरParner News: 'लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अमोल धुरपतेचे यश कौतुकास्पद'

Parner News: ‘लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अमोल धुरपतेचे यश कौतुकास्पद’

spot_img

माजी सभापती काशिनाथ दाते | पारनेर ग्रामीण पतसंथेच्या वतीने सत्कार

पारनेर | नगर सह्याद्री

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नसताना राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे त्यामुळे जामगावच्या अमोल धुरपतेचे यश हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार माजी सभापती काशिनाथ दाते सर यांनी व्यक्त केले आहे.

पारनेर तालुक्यातील जामगाव येथील अमोल मोहन धुरपते यांनी एम पी एस सी परीक्षेत उज्वल यश मिळवल्याबद्दल पारनेर ग्रामीण संस्था परिवार व जामगाव ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती काशिनाथ दाते म्हणाले, अमोल धुरपते याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे २०२२ रोजी मुद्रांक व नोंदणी विभागातील भरले जाणारे सर्वोच्च पद (सब रजिस्ट्रार श्रेणी-१) मिळून उत्तुंग व कौतुकास्पद असे यश मिळवले असून पारनेर तालुक्याला अभिमानास्पद आहे. तसेच ज्या तरुणांनी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आहे त्यांनाही या यशाद्वारे प्रेरणा निश्चित मिळणार आहे.

यावेळी माजी चेअरमन बाळासाहेब सोबले, मनसे तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी, माजी चेअरमन एकनाथ धुरपते, शिवसेना उपतालुका प्रमुख तुषार बांगर, माजी चेअरमन गणेश बर्वे, सरपंच दिनकर सोबले, मनोज शिंदे, व्हा. चेअरमन विष्णू नाईक, नाथू बांगर, सो. संचालक रावसाहेब सोबले, उत्तम सांगळे, पांडुरंग सोबले, अरुण फंड, मोहन धुरपते, शंकर महांडुळे, प्रकाश धुरपते, विष्णू पागिरे, उत्तम सोबले, निवृत्ती फंड, ग्रापं. सदस्य अतुल पवार, महाराष्ट्र पोलीस श्रीकांत सोबले, शेतकरी मोहित पागिरे, आनंदा चौधरी, गणेश धुरपते, पारनेर ग्रामीण पतसंस्था शाखा जामगाव शाखाधिकारी हरीभाऊ कदम व कर्मचारी इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते. अमोल धुरपते यांचे प्राथमिक शिक्षण जामगाव येथे झाले असून माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल पारनेर येथे झाले. पुढे बी.ई मेकॅनिकल अवसरी, पुणे येथे पूर्ण करून २०२१ ला झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून यश संपादन केले होते. नोकरी दरम्यान २०२२ रोजी घेतलेल्या परीक्षेत सब रजिस्टर म्हणून यश संपादन केले त्याचे आई-वडील शेती करतात. यावेळी सौ. पुष्पा बाळासाहेब माळी यांची बिनविरोध लोकनियुक्त सरपंच म्हणून निवड झाल्याबद्दल बाळासाहेब माळी तर विष्णू नाईक यांची व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सन्मान करुन शुभेच्छा दिल्या.

अविरतपणे कष्ट केल्यास यश मिळते

मी २०१९ पासून एम.पी.एस.सीची तयारी करतोय, आजची माझी चौथी पोस्ट आहे. पी.एस.आय, एस.टी.आय, इ.एस.ओ या परीक्षा मी पास झालोय. एस.टी.आय पदावर काम करत असताना एक महिन्याची सुट्टी घेऊन अभ्यास करून राज्यात दहावा क्रमांक मिळवला. माझ्या यशस मी एवढेच सांगेन अविरतपणे कष्ट केल्यास यश मिळते. माझी खात्री आहे इतरांनीही प्रयत्न केल्यास त्यांनाही यश मिळेल, सब रजिस्ट्रार पदाच्या जागा खूप कमी असतात, परंतु मला यश मिळवता आले याचा मला अभिमान आहे

-अमोल धुरपते, सब रजिस्ट्रार

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता...

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

सांगली । नगर सहयाद्री:- मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू...