spot_img
ब्रेकिंगLok Sabha 2024: लोकसभेला पसंती कुणाला? महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेची धक्कादायक...

Lok Sabha 2024: लोकसभेला पसंती कुणाला? महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेची धक्कादायक आकडेवारी समोर

spot_img

नवी दिल्ली | वृत्तसंस्था-
देशात २०२४ साली होणार्‍या निवडणुकांसाठी एनडीए’ आणि इंडिया’ आघाडीनं तयारीला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुतीनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. अशातच महायुतीची काळजी वाढवणारा धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे. यानुसार लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मुसंडी मारेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला चार टक्के अधिक मते मिळतील, असंही सर्व्हेत सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्या पार्श्वभूमीवर एबीपी-सी व्होटर्सनं सर्व्हे केला आहे. त्यात २ लाखांहून अधिक नागरिकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. या सर्व्हेतील आकडे महाविकास आघाडीसाठी दिलासादायक तर भाजपासह शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाची काळजी वाढवणारे आहेत.

२०१९ साली शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर येत महाविकास आघाडीच्या नावाखाली सरकार स्थापन केलं. पण, २०२२ मध्ये शिवसेना आणि २०२३ जून मध्ये राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार गटाला बरोबर घेतल्यानं भाजपाची ताकद वाढल्याचं बोललं जातं. पण, सर्वेतून वेगळीच आकडेवारी समोर आली आहे.

सर्व्हे काय सांगतो
महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष आहे. तर, महायुतीत शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपा आहे. सर्व्हेनुसार लोकसभेला महाविकास आघाडीला २६ ते २८ जागा मिळण्याची शयता वर्तवली आहे. तर, महायुतीला १९ ते २१ जागा मिळतील. अन्य पक्षांना २ जागा मिळतील, असं सर्वेत सांगण्यात आले आहे. मतांच्या टक्केवारीतही महाविकास आघाडी वरचढ दिसत आहे. महाविकास आघाडीला ४१ टक्के मते मिळू शकतात. तर, महायुतीला ३७ आणि बाकी पक्षांना २२ टक्के मते मिळतील, असं अंदाज सर्व्हेत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बारस्कर महाराजांना धमकी! ‘या’ पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर। नगर सहयाद्री- मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी गंभीर आरोप करणारे अजय...

महापालिकेत ‘तो’ ठराव मंजूर? ‘अहमदनगरचं नाव आता अहिल्यानगर’

अहमदनगर। नगर सहयाद्री- नगरकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.अहमदनगर जिल्ह्याचं नाव आता पुण्यश्लोक अहिल्याबाई...

Rain Update: पुढील ४८ तासांत मुसळधार! महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट

मुंबई। नगर सहयाद्री- जानेवारी ते मार्च या हंगामात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शयता भारतीय...

आजचे राशी भविष्य ! तुमच्या राशींसाठी कसा आहे ‘शनिवार’?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आज तुम्हाला मिळालेल्या मोकळ्या वेळेचा फायदा घ्या आणि...