spot_img
महाराष्ट्रपंकजा मुंडे-मनोज जरांगे एकाच स्टेजवर, मुंडेंनी ‘ओबीसीत आपले स्वागत’ असे म्हणताच 'अशी'...

पंकजा मुंडे-मनोज जरांगे एकाच स्टेजवर, मुंडेंनी ‘ओबीसीत आपले स्वागत’ असे म्हणताच ‘अशी’ होती जरांगेंची प्रतिक्रिया…

spot_img

माजलगाव / नगर सह्याद्री : मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी मोठा लढा दिला. त्यांना यात यशही मिळाले. यानंतर अनेक ओबीसी नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. दरम्यान आता एका विवाह सोहळ्यात माजी मंत्री पंकजा मुंडे आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील एकत्र आले हाेते.

माजी मंत्री आरोग्य मंत्री राजेश टोपे, मनोज जरांगे, पंकजा मुंडे यांची शेजारी शेजारी बसण्याची व्यवस्था केली होती. यावेळी पंकजा मुंडे यांनी जरांगे यांचे ‘आपला ओबीसीत समावेश झाला असून तुमचे स्वागत आहे,’ अशा पद्धतीने स्वागत केले.

प्रथमच पंकजा मुंडे आणि जरांगे समोरासमोर आल्याने त्यांच्यात कोणता संवाद होईल अशी सर्वांना उत्सुकता लागलेली होती. मुंडे आणि जरांगे या दोन नेत्यांची पहिली भेट कशी होणार, दोघांत काय संवाद होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. ‘ओबीसीत स्वागत आहे’ असे पंकजा यांनी जरांगे यांचे स्वागत करताच उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. जरांगे पाटील यांनीही स्मितहास्य करत दाद दिली.

मराठा-ओबीसीत वितुष्ट करणाऱ्यांना आळा बसेल
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी अध्यादेश निघताच सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या , गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र अत्यंत तणावपूर्ण वातावरणातून जात आहे. मराठा आणि ओबीसी समाजात वितुष्ट आणू पाहताय त्या प्रवृत्तींना आपल्याला आळा घातला पाहिजे. यात संयमाची भूमिका घेण्याचा मी वेळोवेळी प्रयत्न केला. सरकारने अध्यादेश काढलाय. सर्वसंमतीने अध्यादेश निघालेला असावा असे त्या म्हणाल्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...