spot_img
देशमोठी बातमी : ED कडून मुख्यमंत्र्यांना कधीही होऊ शकते अटक, पहा काय...

मोठी बातमी : ED कडून मुख्यमंत्र्यांना कधीही होऊ शकते अटक, पहा काय घडतंय

spot_img

नवी दिल्ली / नगर सहयाद्री : ED कडून सध्या विविध राजकीय नेत्यांभोवती चौकशीचा फास आवळला जात आहे. महाराष्ट्रातील काही नेत्यांना अटकही करण्यात आली होती. केंद्रातील सरकार आपल्या राजकीय फायद्यासाठी ईडीचा वापर करते, असा आरोप विरोधी पक्षांकडून भाजपावर केला जातो.

आता आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भर यात पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईडीकडून यावेळी थेट अटकेची कारवाई होऊ शकते असे म्हटले जात आहे. जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये चौकशी करण्यासाठी प्रवर्तन निर्देशालयची एक टीम राजधानी दिल्लीत दाखल झाली आहे.

ही टीम हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी दाखल झाली आहे. हेमंत सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत. हेमंत सोरेन हे दक्षिणी दिल्लीतील शांती निकेतन या निवासस्थानी राहतात. त्यांच घर दक्षिणी दिल्लीतील पॉश भागात आहे. हेमंत सोरेन यांची आधी सुद्धा ईडीने चौकशी केली आहे.

ईडीने रांचीमध्ये आठ तास त्यांची चौकशी केली होती. हेमंत सोरेन यांना काही दिवसांपूर्वी 10 व समन पाठवण्यात आलं. हजर नाही झालात, तर आम्ही चौकशीसाठी येऊ असं ईडीने आधीच सांगितलं होतं. प्रवर्तन निर्देशालयाकडून समन जारी झाल्यानंतर हेमंत सोरेन अचानक दिल्लीला रवाना झाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हात, पाय, मुंडके तोडलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडले

माउली गव्हाणे खून झालेल्या व्यक्तीचे नाव | सागर गव्हाणे आरोपी श्रीगोंदा | नगर सह्याद्री -  श्रीगोंदा...

शिवजयंती धूमधडाक्यात साजरी  

अहिल्यानगर | नगर सह्याद्री हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती सोमवारी नगर शहरात...

कर्मवीर अण्णा, ‘रयत’चे काही शिक्षक का झालेत सैराट?; नगरच्या ‘या’ शाळेत तब्बल सात शिक्षक निघाले सैराट…

पवार साहेब, आवरा तुमच्या जनरल बॉडी सदस्यांसह पदाधिकार्‍यांना / पठार भागातील पालकांनी मुली शाळेत...

लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांची मोठी घोषणा; म्हणाले “योजना बंद करणार नाही, पण…”

मुंबई / नगर सह्याद्री : लाडकी बहिण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. या योजनेअंतर्गत दर...