spot_img
ब्रेकिंगपहलगाम हल्ला पाकिस्तानचेच षडयंत्र: केंद्र सरकारने सडेतोड जवाब द्यावा; काळे

पहलगाम हल्ला पाकिस्तानचेच षडयंत्र: केंद्र सरकारने सडेतोड जवाब द्यावा; काळे

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जम्मू कश्मीरच्या पहेलगाम मध्ये निष्पाप भारतीय हिंदू पर्यटकांवर भ्याड हल्ला करत मृत्यू तांडव घडवून आणणाऱ्या अतिरेक्यांचे, पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर्स अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करत जाळण्यात आले. मुर्दाबाद.. मुर्दाबाद.. पाकिस्तान मुर्दाबाद… अशी जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी दिल्ली गेट परिसर दणाणून सोडला. हा हल्ला पाकिस्तानचच षडयंत्र आहे. केंद्र सरकारने करारा जवाब देत पाकड्यांची मस्ती जिरवावी, अशी मागणी शहरप्रमुख किरण काळे यांनी केली आहे. मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, शिक्षक सेना जिल्हाप्रमुख प्रा.अंबादास शिंदे सर, कामगार सेनेचे विलास उबाळे, उपशहर प्रमुख जेम्स आल्हाट, उपशहर प्रमुख दीपक भोसले, किरण बोरुडे, माजी नगरसेवक सुनील त्रिपाठी, माजी नगरसेवक पप्पू ठुबे, सावेडी उपनगराचे उपप्रमुख प्रशांत पाटील, सुनील भोसले, सचिन शेंडगे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकारी शहर जिल्हाध्यक्ष अनिकेत कराळे, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषा भगत, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, माथाडी कामगार सेना विभाग शहरप्रमुख गौरव ढोणे, युवासेना विधानसभा प्रमुख आनंद राठोड, किशोर कोतकर, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, अशोक जावळे, आनंद जवंजाळ, केशव दरेकर, गणेश आपरे, महावीर मुथा, अमित शिंदे, विनोद दिवटे, अमोल सानप, रमेश आव्हाड, जयराम आखाडे, नितीन जगधने, महावीर मुथा, महादेव बुरा, दीपक गांगुर्डे, प्रकाश शिंदे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहिल्यानगर शहरातील तृतीयपंथी समाजाचे अध्यक्ष काजल गुरु यांच्यासह जिल्ह्यातील काही पर्यटक श्रीनगर मध्ये अडकले आहेत. त्यांना लवकरात लवकर अहिल्यानगर मध्ये सुखरूप आणण्यासाठी प्रशासन, राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी शहर प्रमुख किरण काळे यांनी केली आहे. राजेंद्र दळवी म्हणाले, महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी पुरविण्यात आलेल्या विशेष विमानांचा खर्च हा राज्य सरकारला करावा लागला. केंद्र सरकारने अशा कठीण प्रसंगी तरी महाराष्ट्रातील पर्यटकांना सापत्नीक वागणूक द्यायची नव्हती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षण; सरकारसमोर मोठं आव्हान; कोर्टात ‘या’ गोष्टी सिद्ध कराव्या लागणार

Maratha Reservation : तर मराठा सामाजासाठी एसईबीसीचा जो मध्यममार्ग सरकारने शोधला होता. त्याचावर वक्रदृष्टी...

विधानसभेतील गद्दारांना योग्य ती शिक्षा मिळणार; खा. लंके यांचे आगामी निवडणुकाबाबत मोठे वक्तव्य

पारनेर । नगर सहयाद्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार करत खासदार नीलेश...

शेवगाव, पाथर्डीतील मावा विक्रेत्यांवर छापे; ४ आरोपींना अटक

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यांमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर मावा व...

२६ गोवंशीय जनावरांची सुटका; पोलिसांनी ‘असा’ लावला सापळा, ३ आरोपींसह मुद्देमाल ताब्यात

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे आणलेल्या २६ गोवंशीय जनावरांची...