spot_img
महाराष्ट्रशरद पवारांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली; नेमकं काय म्हणाले पहा...

शरद पवारांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली; नेमकं काय म्हणाले पहा…

spot_img

सोलापूर / नगर सह्याद्री –
Gopichand Padalkar | Sharad Pawar : ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव सध्या चर्चेत आहे. हे गाव सध्या राजकीय घडमोडींचं केंद्र बनलं आहे. मॉक पोलिंगचा निर्णय घेतल्यानंतर हे गाव चर्चेत आलं. या गावात शरद पवार गेले होते. त्यानंतर आज महायुतीच्या नेत्यांनी सभा घेतली. यावेळी भाजपचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. तसेच जयंत पाटील, रोहित पवारांसह सुप्रिया सुळेंवरही हल्लाबोल केला आहे.

यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, “ईव्हीएमला विरोधी करून बॅलेट पेपेरवर मतदान घेण्याची मागणी करणाऱ्या आणि त्यासाठी आंदोलन करणाऱ्या शरद पवारांना आमचे आवाहन आहे की. शरद पवारांनी सर्वप्रथम आपल्या लेकीचा, आपल्या नातवाचा तसेच जयंत पाटील यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या तिघांचा पहिल्यांदा राजीनामा घेऊन त्यानंतर हे आंदोलन पुढे नेले पाहिजे.

तसेच काँग्रेसच्या राहुल गांधी आणि त्यांच्या बहीण प्रियंका गांधी यांनीही राजीनामा देऊन या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. अन्यथा EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, असे म्हणत पडळकरांनी शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला आहे.

शरद पवार यांचे सर्व राजकारण विश्वासघातावर अवलंबून होते. त्यांची अक्कल देखील या आंदोलनात संपल्याचे दिसते. 2017 ते 2024 पर्यंत एकानेही मशीनमध्ये कसा घोटाळा होतो ते दाखवू शकले नाहीत. जयंत पाटील यांनी हे सिद्ध केले तर लायकी नुसार 101 रुपयाचे बक्षीस आणि दुसऱ्या कोणीही हॅक करून दाखवल्यास 11 लाखाचे बक्षीस देऊ असेही गोपीचंद पडळकर म्हणाले.

राम सातपुते नेमके काय म्हणाले?
“अकलूज नगर परिषदेचा नगराध्यक्ष भाजपचा असेल, शेतकऱ्यांना लुटणारा शंकर सहकारी साखर कारखान्यावर येत्या ६-७ महिन्यात प्रशासक बसवल्याशिवाय राहणार नाही. यशवंत सहकारी साखर कारखान्यावर देखील चौकशी लावू. माळशिरस तालुक्याची जी लूटमार केली. माळशिरस तालुक्यातल्या गोर गरीब, सामान्य शेतकऱ्यांचे आणि वंचित घटकांचे पैसे ज्या सुमित्रा बँकेत ठेवले. ती बँक मोहिते पाटलांनी लुटली.

या स्टेजवरून मी मारुतीच्या साक्षीने सांगतो की, ज्या जयसिंह मोहिते पाटलांनी सुमित्रा बँक बुडवून खाल्ली, त्याला वर्षाच्या तुरुंगात नाही टाकलं, तर नावाचा राम सातपुते नाही. ज्या मोहिते पाटलांनी विजय मल्टीस्टेट बँक बुडवून खाल्ली, त्या मोहिते पाटलांना तुरुंगात टाकलं नाही, तर राम सातपुते नाव लावणार नाही.” असे राम सातपुते म्हणाले आहेत.

तसेच निवडणुकीत ज्यांनी विरोधात काम केले आणि आता भाजप नेत्याचे पाय धरत आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील थोडी जरी लाज शिल्लक असेल तरी राजीनामा द्या. गद्दारांना माफी नको हे फडणवीस साहेबांना सांगा असे राम सातपुते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक; गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शिर्डी । नगर सहयाद्री:- भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक होत असल्याचा...

‘पारनेरला शनिवारी राष्ट्रवादीचा मेळावा’; कोण राहणार उपस्थित?

तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...

‘कष्टाचे दाम मिळविण्यासाठी बळीराजाचा संघर्ष’

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील बाजारात भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य समाधान व्यक्त करत...

नगर शहरात 36 जागांवर ‌‘पे अँड पार्क‌’; पार्किंगसाठी दर काय? वाचा महत्वाची बातमी..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर शहरात वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, एकेरी वाहतूक आदींचे नियोजन करत...