मुंबई। नगर सहयाद्री-
ऐन दिवाळीच्या तोंडावर देशभरात कांद्याच्या किंमती महाग झाल्यामुळे सामान्यांनाचा खिशाला मोठा झटका सहन करावा लागत आहे. आधीच अपुऱ्या उत्पादनामुळे हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये यांच्या किंमती देखील महागल्या आहेत. अशातच कांद्याच्या किमतीने सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
काही दिवसांपूर्वी देशभरात टॉमेटोनं सर्वसामान्यांच्या खिशाचा रस भर काढा होता. अत्ता कांद्याने चागलाच भाव खाल्याचे दिसत आहे. अचानक झालेली ही कांद्याची भाववाढ सामन्यांचे बजेट बिघडवत आहे. बाजारात २५ ते ३० रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा आता ५० ते ६० रुपये किलोदाराने विकला जातो आहे.
यंदाच्या पावसाने दडी मारल्यामुळे पालेभाजांचे व कांद्याचे दर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान कांद्याच्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणा आता सज्ज झाली आहे. कांद्याची मागणी कमी करण्यासाठी बफर स्टॉकमधील कांदा केंद्र सरकार बाजारात विक्री साठी आणणार आहे. तसेच, कांद्याची साठेमारी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश अन्न व पुरवठा मंत्रालयाने केली आहे.