बीड / नगर सह्याद्री :
बीडमध्ये ढाकणे कुटुंबातील पिता पुत्रावर झालेल्या मारहाणप्रकरणी सतीश भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर सतीश भोसलेचे अनेक कारनामे समोर आले आहेत. सतीश भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात आला, पण त्याला अटक कधी होणार? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. अशातच सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या साडू विरूद्धही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या साडू विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक कोटींची खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी, या दोन गुन्ह्यांखाली त्याच्या विरूद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत अरफान चव्हाण असे सतीश भोसलेच्या साडूचे नाव असून, आजिनाथ सावळेराम खेडकर यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर येत आहे. सतीश भोसले याचा साडू तसेच इतर काही जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय.
जमीन खरेदीनंतर त्याचा ताबा घेण्यासाठी खेडकर कुटुंब गेले होते. त्यावेळी प्रशांत अरफान चव्हाण यानं आणि त्याच्या बरोबर असलेल्या इतर ९ जणांनी खेडकर कुटुंबाला धमकी दिली होती. त्यानंतर खेडकर कुटुंबानं पोलीस ठाण्यात धाव घेत सात महिला आणि दोन पुरुषांवर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.