spot_img
ब्रेकिंगउद्धवजी, तुमच्या हिंदुत्वाला उपनेत्यानेच छेद दिलाय!

उद्धवजी, तुमच्या हिंदुत्वाला उपनेत्यानेच छेद दिलाय!

spot_img

संजय राऊतांचा पठ्ठ्या शिवसेना उपनेता साजन पाचपुते निघाला गोवंशाची कत्तल करणाऱ्या गँगचा म्होरक्या!
सारिपाट / शिवाजी शिर्के
हिंदुत्वाच्या मुद्यावर आणि त्यातही खासकरुन गोवंश हत्येच्या विरोधात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रान पेटवले असताना त्यांच्याच शिवसेनेचा राज्यपातळीवरील उपनेता साजन पाचपुते हा गोवंशाची कत्तल करण्यास निघालेल्या गँगचा म्होरक्या निघाल्याचे स्पष्ट झाले. गोवंशाची हत्या करणाऱ्या अटकाव करण्याचे सोडून त्या गायींची सुटका करण्यास आलेल्या गोरक्षकांना थेट जीवे मारण्याची धमकी देताना ते लोक माझे आहेत आणि ते गायींची कत्तल माझ्या जीवावर करतात, माझ्या नादाला लागू नको नाही तर तुला येथून जिवंत जाऊ देणार नाही अशी थेट धमकीच साजन पाचपुते याने गोरक्षकांना दिली. उद्धवजी, तुम्हाला आणि तुमच्या शिवसेनेला नक्की कोणते हिंदुत्व अपेक्षीत आहे! एका गावच्या सरपंचाला उपनेतेपद दिलेच कसे यावर संपूर्ण जिल्ह्यात प्रश्नचिन्ह असताना हाच साजन फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी निघाला! त्याच साजनवर आता गोरक्षकांना धमकावल्याचा गुन्हा दाखल झालाय! उद्धवजी, नगर जिल्ह्यात पुरती पडझड झाली असताना तुम्हाला नक्की कोण हवंय आणि कोणतं हिंदुत्व हवंय! संजय राऊत साहेबांच्या ‌‘खास‌’ मजींतील साजन आता तुमच्या हिंदुत्वाबद्दलच जनतेच्या मनात शंका निर्माण करतोय! खरेतर जरा खासगीत चौकशी केली तर काष्टीच्या बाजारात गोवंशाच्या अनुषंगाने चाललेला हा प्रकार नवीन नसल्याचे समोर येईल. सदाअण्णांच्यावर देखील कुरेशींना सांभाळत असल्याचा आरोप झाला होता आणि त्यात त्यावेळी तथ्यांश देखील समोर आले होते. बबनराव पाचपुतेंनी बंधूप्रेमापोटी त्यावेळी सदाअण्णावरील हे प्रकरण मिटवले होते! आता त्याच सदाअण्णांचा मुलगा साजन त्याच गोवंशाच्या प्रकरणात आरोपी झालाय! यात राजकीय दबाव, त्यातून गुन्हा अशी चर्चा किंवा बोलले गेले तरी त्यात काहीच अर्थ नाहीय! साजनजी, तुमचं काय व्हायचं ते होऊ देत! पण, आधीच अडचणीत आलेल्या आमच्या उद्धव साहेबांना अडचणीत आणण्याचे काम तुम्ही का करताय! संजय राऊत साहेब, तुम्ही सातत्याने याच साजनला पाठीशी घालत आला आहात! यातही तुम्ही त्याला पाठीशी घालणार असाल तर उद्धवसाहेबांची शिवसेना संपवून टाकण्याचा तुम्ही विडा उचलला असल्याचा जो आरोप होतोय, त्याला ही पुष्टी समजायची का?

अक्षय राजेंद्र कांचन व त्यांचे सहकाऱ्यांना काष्टी परिसरात कत्तलीसाठी काही गोवंशाची जनावरे डांबून ठेवली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अक्षय कांचन हे त्यांचे सहकारी गोरक्षक आकाश अशोक लोंढे, आकाश मधुकर लांडगे, दत्ता ठोंबरे, शुभम मासोळे, आप्पा लोंढे, विकास तरंगे व वैभव खैरे व ऋतिक चौधरी, शुभम तनपुरे हे उरुळीकांचन व यवत या ठिकाणावरुन नगरच्या दिशेने गोरक्षणासाठी निघाले. हिरडगाव फाटा या ठिकाणी ते आले असता त्यांची खात्री झाली. यानंतनर त्यांनी पोलिसांना गोवंशाच्या जनावरांची माहिती दिली. पोलिस मदतीला आल्यानंतर हिरडगाव फाटा परिसरातील महेश चव्हाण व शारदा महेश चव्हाण यांच्या कोकणगाव हिरडगाव कारखान्या शेजारी पोलीसांसोबत तेथे गेले. तेथे कत्तल करण्याच्या उद्देशाने 14 जस जातीच्या गोवंश डांबुन बांधुन कोणत्याही चारा पाण्याची व्यवस्था न करता कत्तल करण्यासाठी बांधुन ठेवलेल्या आढळुन आले.

त्यानंतर या गोवंश जनावरांना पाणी पाजून त्यांना चारा देऊन त्यांना मोकळ्या जागेत बांधले गेले. त्यावेळी चव्हाण त्याच्या शेजारीच हातभट्टी दारु काढत बसला होता. त्याने गोवंशाच्या जनावरांबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली. मुकाट्याने तुम्ही येथून निघून जा तुम्हाला माहिती नाही का आम्ही साजन भैय्या पाचपुतेंच्या जवळची माणसे आहेत. भैय्याला सांगुन आम्ही तुम्हाला घोड़ाच लावु अशा प्रकारची दमदाटी केली. याचेवळी सदर महिलेने तेथे त्यांचे समाजातील काही लोकांना व तिचे पती महेश चव्हाण आणि तंटामुक्ती अध्यक्ष श्री शिंदे यांना तेथे बोलावुन घेतले. गोरक्षकांना त्यांनी अँट्रासिटी दाखल करु तुम्हाला येथुन जिवंत सुद्धा जाऊ देणार नाही अशी धमकी दिली.

पोलिसात दाखल फिर्यादीत अक्षय कांचन याने म्हटले आहे की, महेश चव्हाण याने त्याचेकडे असलेल्या त्याचे मोबाईल वरुन साजन भैय्या पाचपुते यांना फोन लावुन दिला. साजन भैय्या सोबत बोल असे बोलला. त्यावेळी तो फोन घेऊन मी साजन सदाशिव पाचपुते यांचेबरोबर फोनवर बोलु लागलो त्यावेळी साजन पाचपुते यांनी तेथुन तु निघुन जा नाहितर तुला जिवे ठार मारेल अशी पोलीसांसक्षम धमकी दिली व गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. यानंतर मी त्याला माझे नाव सांगितले आणि पोलिसांच्या मदतीने एका टेंपोत त्या गायी भरल्या! त्यानंतर साजनने त्या टेम्पो चालकाला शिवीगाळ केल्याने तो निघून गेला. यानंतर गोरक्षकांनी ही जनावरे हातात धरुन घेऊन जाण्यास सुरुवात केली असता त्यांना शिवीगाळ, दमदाटी आणि दगडफेक करण्यास साजनने प्रवृत्त केल्याचे म्हटले आहे.

खरेतर या संपूर्ण प्रकरणात हिंदुत्वासाठी कायम आग्रही राहणारे उद्धव ठाकरे हेच अडचणीत आले आहेत. त्यांच्याच पक्षाचा उपनेता गोवंश हत्या करणाऱ्या टोळीचा ‌‘सपोर्ट सिस्टीम‌’ झालाय हे उघड झाले आहे. संघटना आधीच अडचणीतून जात असताना साजन पाचपुते याने त्यात आणखी भरच टाकली! उद्धवजी, खरेतर या प्रकरणात तुम्ही काय भूमिका घेतात यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. निर्णय तुमचा आहे आणि त्याचे परिणाम काय होतील हे स्पष्टपणे लिहीण्याची गरज नक्कीच नाही!

उद्धवजी, कुरेशी अन्‌‍ पारधी समाजाला दगडफेक करण्यास कोणी लावले?
गोरक्षकांनी गोवंशातील जनावरांची सुटका केल्यानंतर ते गोवंश चालत घेऊन रस्त्याने निघाले असता तेथील जवळील शेतात काही कुरेशी समाजाचे लोक व पारधी समाजाचे लोक हातात दगडे घेऊन आम्हाला मारु लागले त्यावेळी श्रीगोंदा पोलीस स्टेशनची अजुन एक टीम तेथे आली. ही टीम आल्याचे पाहून या लोकांनी पळ काढला असल्याचे अक्षय कांचन याने फिर्यादीत म्हटले आहे. उद्धवजी, जरा खोलात गेलात तर दगडफेक करण्यास लावणारा कोण हे स्पष्टपणे समोर येईल! तुम्ही नक्की कोणाला आणि कशासाठी पोसत आहात या प्रश्नाचे उत्तर शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना द्या! वेळ अद्यापही गेलेली नाही!

अक्षय कांचन आणि टीमचा मातोश्रीवर सत्कार होण्याची गरज!
साजन पाचपुते हा शिवसेनेचा उपनेता असतानाही तो गोवंशाची हत्या करणाऱ्या टोळीचा म्होरक्या असल्याचे लक्षात येताच अक्षय कांचन व त्यांच्या गोरक्षक साथेीदारांनी साजन पाचपुते याला खडे बोल सुनावले. अक्षय साजनसोबत फोनवर बोलताना म्हणाला की, माझे पुर्ण नाव अक्षय राजेंद्र कांचन, राहणार उरळीकांचन पुणे येथील गोरक्षक असुन मी आजपर्यंत असल्या धमक्यांना घाबरलो नाही आणि मी येथे आलोय तर हे गोवंश कारवाई करुन या गोवंशाचे प्राण वाचवुन गोशाळेत सोडेल त्यावेळेसच निघून जाईल. तुम्हाला जे करायचे ते हव ते करा मला फरक पडत नाही. अक्षयचे हे खडेबोल ऐकताच साजन पाचपुतेने फोन कट केला. गोरक्षकाच्या भूमिकेत कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या या टीमचे खरे तर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावून सत्कार केला पाहिजे. मात्र, हा सत्कार संजय राऊत साहेब होऊ देतील का हा खरा प्रश्न आहे!

साजन म्हणाला, हे लोक माझ्या जीवावर कत्तली करतात!
उद्धवजी, शिवसेनेचा उपनेता असलेल्या साजन पाचपुते याने अक्षय कांचन याला दमदाटी करताना स्पष्ट कबुली दिलीय! ‌‘हे लोक माझे आहेत, ते गायींची कत्तल माझे जीवावर करतात त्याच्यामुळे त्यांच्या नादाला लागु नको नाहीतर तुला येथुन जिवंत जाऊ देणार नाही हे लक्षात ठेव‌’, अशी धमकीच त्याने दिली. उद्धवजी, कत्तली करणाऱ्यांच्या टोळीचा तुमचा उपनेता झालाय हे सांगण्याची आता गरज राहिलीच नाही!

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...