spot_img
ब्रेकिंगअरे दिवानो.. मुझे पहचानो.. मैं हू डॉन..! गाण्यावर खा. विखे, कर्डिले थिरकले,...

अरे दिवानो.. मुझे पहचानो.. मैं हू डॉन..! गाण्यावर खा. विखे, कर्डिले थिरकले, कार्यक्रमात रेकॉर्ड ब्रेक गर्दी

spot_img

राहुरी । नगर सहयाद्री
आपल्या खास धमाल गाण्यांच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या गाण्यांवर गुप्ते यांनी खा.सुजय विखे यांना नाचायला भाग पाडलेच. अरे दिवानो, मुझे पाहचानो.. में हु डॉन.. या गाण्यावर खा.सुजय विखे चांगलेच थिरकले. यावेळी समर्थक चाहत्यांनी खा. विखे आणि माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांना खांद्यावर घेत नाचत एकच जल्लोष केला. यावेळी काळा गॉगल घालून कर्डीले, विखे यांनीही खांद्यावर नाचत गाण्याचा आनंद घेतला.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भाजप खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील विविध तालुयांत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिली जात आहे. कला, मनोरंजन, गायन, संगीत क्षेत्रातील नामवंत सेलिब्रेटींच्या उपस्थितीत होत असल्याने या सर्व कार्यक्रमांना महिलावर्गाची जबरदस्त गर्दी दिसून येत आहे. अगदी शालेय मुली, कॉलेज युवतींपासून लग्न झालेल्या महिला, मुलं-नातवंड असलेल्या आजीबाईंपर्यंत या रंगारंग कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेताना दिसून येत आहे.

याबाबत फाउंडेशनच्या धनश्री विखे आणि खा. सुजय विखे यांनी सांगितले की, भारतीय समाजात घरामध्ये स्त्री ला निश्चितच मानाचे आणि आदराचे स्थान दिले जाते. अनेक युवती-महिला शिक्षण आणि त्यांच्यातील कलागुण कौशल्याने नोकरी-व्यवसायात स्थिरावत असल्या तरी एकूणच स्त्रीला आजही घरातील सर्व कौटुंबिक जबाबदार्‍यांमुळे सार्वजनिक जीवनात घेता येईल असा मनोरंजन, छंद आदींचा आनंद घेता येत नाही. घरातील कामांची व्यस्तता आणि समाज काय म्हणेल म्हणून महिलांची व्यक्ती म्हणून घुसमट होत असते. त्यामुळे आम्ही महिला दिनाचे औचित्य साधून सर्व घटकांतील युवती-महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड नंतर राहुरी इथे आयोजित कार्यक्रमास तर रेकॉर्डब्रेक गर्दी झाल्याचे दिसून आले. असंख्य महिलांची उपस्थिती, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि दिलखेचक लावणी नृत्यासाठी ओळख निर्माण केलेल्या मानसी नाईक यांचे प्रेक्षकांवर भुरळ घालणारे नृत्य, प्रसिद्ध धम्माल गायक, परीक्षक अवधूत गुप्ते यांचा प्रेक्षकांची मने जिंकणारा आवाज, महिलांसाठी पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसांची लयलूट आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कर्तृत्ववान महिलांचा केलेला सन्मान असा अनोखा आणि दैदिप्यमान सोहळा राहुरी येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दीसह पार पडला.

या कार्यक्रमात शशिकला पाटील, पुष्पलता येवले, डॉ. दिपा कुसळकर, ब्रह्मशांती पद्मादेवी, कविता जाधव, डॉ. केतन साळवे, ह.भ.प. वंदना आंधळे, ज्योती खेडेकर/ धामोरे, ज्योती शिंदे, सोनाली बर्डे, सविता मगर, काजल शर्मा, सखुबाई जाधव, उद्योजिका रोहिणी कुसमुडे, उमा जैन, वंदना कांडेकर, वैशाली धसाळ, ह.भ.प. सोनालीताई गावडे/ तागड, प्रमिला ढोकणे आदी कर्तृत्ववान महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

रेकॉर्ड ब्रेक गर्दी..
जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून राहुरी येथे आयोजित कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव २०२४ साठी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. गेल्या आठवडाभरात वेगवेगळ्या तालुयांमध्ये सुरू असलेल्या या महोत्सवाला जी गर्दी पाहायला मिळाली त्यापेक्षा अधिक गर्दी कालच्या या भव्य सोहळ्यात दिसून आली. खरंतर हा एक ऐतिहासिक आणि अविस्मरणीय असा क्षण होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Sujay vikhe patil : ‘विखे कुटुंबीयांचे योगदान जनता विसरणार नाही, विखेंनाच निवडून देतील’

राहुरी / नगर सह्याद्री Sujay vikhe patil : विखे कुटुंबीयांनी गेली तीन पिढ्यापासून जिल्ह्यासाठी...

मंदिरचा चौथरा पाडला, ग्रामस्थ आक्रमक; नगर तालुक्यातील ‘या’ गावात घडला प्रकार

अहमदनगर | नगर सह्याद्री नवनागापूरमध्ये छत्रपती नगर परिसरात आठ महिन्यापूर्वी लोकवर्गणीतून ओपन स्पेसमध्ये बांधलेले शनी...

सुजय विखेंच्या रॅलीत झळकले संदीप कोतकरांचे बोर्ड…

महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ कोतकर यांची भव्य बाईक रॅली अहमदनगर | नगर...

Ahmednagar crime : अतिक्रमणावरून गौरी घुमट परिसरात राडा

अहमदनगर | नगर सह्याद्री Ahmednagar crime : अतिक्रमण काढण्यावरून गौरी घुमट परिसरात दोन गटात हाणामारीची...