spot_img
अहमदनगरनगरकरांवर १५० कोटींचे कर्ज टाकण्याचा घाट! शहर काँग्रेसचे मनपाच्या बजेटवर आरोप

नगरकरांवर १५० कोटींचे कर्ज टाकण्याचा घाट! शहर काँग्रेसचे मनपाच्या बजेटवर आरोप

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
मीटरने पाणीपुरवठा, उपनगरात भुयारी गटार योजनेचे काम, सीएसआर निधीतून कामे यासह कर वाढ न करता मनपाने बजेट जाहीर केले आहे. यावर शहर काँग्रेसने सडकून टीका केली आहे. मनपाचे बजेट हे गोलमाल बजेट असून सर्वसामान्य नगरकरांची घोर निराशा करणारे आहे. १ हजार ५६० कोटींचे पोकळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. नगरकरांवर १५० कोटींच्या कर्जाचा बोजा टाकण्याचा घाट बजेटच्या आडून घातला गेला असल्याचा आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.

मनपावर प्रशासकराज असले तरी सत्ताधारी सरकारचा आणि त्याच्या स्थानिक प्रतिनिधींचा मनपा प्रशासनावर पूर्ण प्रभाव आहे. राजा बोले, दल हाले अशी स्थिती मनपात आहे. नगरकरांचे प्रश्न सोडविणे, मूलभूत सोयी सुविधा पुरविणे ही कामे मनपा करत नसून ठेकेदार पोसणे, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणे ही कामे होत आहेत. मनपा ही रिमोट कंट्रोलवर चालते असे म्हणत काँग्रेसच्या वतीने काळे यांनी मनपाच्या बजेटवर टीका केली आहे.

मीटर बसवण्यावरूनही काळे यांनी घणाघात केला. शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आजही आठ-आठ दिवस पाणी येत नाही. मुळात तुम्ही पाणीच ३६५ दिवस, मुबलक आणि स्वच्छ देऊ शकत नाही. तर मीटर काय बसवत आहात ? असा संतप्त सवाल किरण काळे यांनी केला आहे. तसेच क्रवाढीवरूनही त्यांनी निशाणा साधत म्हटले आहे की, मनपा बजेटमध्ये करवाढ करणार नाही असे म्हटले आहे.

तर दुसरीकडे ड्रोन द्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण करून मालमत्ता कराची पुन्हा आकारणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुळात अशा छुप्या पद्धतीने कर वाढ करण्याचा कोणताही नैतिक अधिकारच मनपाला नाही. राजकीय प्रभावातून निवडणुकांमुळे थेट करवाढ जरी करत नसले तरी देखील ड्रोन सर्वेक्षणाचे नाव पुढे करून नगरकरांच्या लुटीचा डाव आखला गेला असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने किरण काळे यांनी बजेटवर केला आहे.

कर्जबाजारी करण्याऐवजी भ्रष्टाचार करू नका
महापालिका विकास कामांसाठी पहिल्यांदाच कर्ज घेणार असल्याचे बजेटमध्ये म्हटले आहे. केंद्र शासनाच्या मोठ्या योजनांचा मनपा हिस्सा भरण्यासाठी रू. १५० कोटींचे कर्ज घेण्याचे बजेटमध्ये सादर केले आहे. यावर काळे म्हणाले, ज्या अधिकार्‍यांनी प्रशासक या नात्याने बजेट तयार केले आहे ते काही दिवसांनी बदल्या होऊन जातील. पण जाताना महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरकरांना कर्जबाजारी करण्याचा घाट त्यांनी घातला आहे. शेकडो कोटींच्या विकास कामांच्या नावाखाली कर्ज काढली जातील. दर्जाहीन कामे ठेकेदारांच्या माध्यमातून केली जातील. यातून ठेकेदार, मनपा प्रशासन आणि पुढारी संगनमत करून कोट्यावधींचा भ्रष्टाचार करतील. नगरकरांना कर्जबाजारी का करता ? त्याऐवजी भ्रष्टाचार करू नका, असा खोचक सल्ला काळे यांनी दिला आहे.

मनपात २०० कोटींपेक्षा जास्त भ्रष्टाचार
सुमारे ७७८ रस्त्यांच्या कामांमध्ये सुमारे रू. २०० कोटीहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार मनपाने अधिकारी, ठेकेदार, पुढारी यांच्या संगनमतातून झाला आहे. त्याची फिर्याद मी स्वतः काँग्रेसच्या वतीने अँटीकरप्शनकडे दिली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. भ्रष्टाचार करायचा, नगरकारांना लुटायचे आणि दुसरीकडे मनपा हिस्सा भरण्यासाठी कोट्यावधींचे कर्ज काढायचे हे चुकीचे धोरण असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...

अहमदनगर ब्रेकिंग! तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात! ‘असा’ लावला सापळा

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी...

कांद्याची महाबँक: उल्लू बनविणारा प्रयोग!अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना गंडवले

अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना...

बागुल पंडुगू सण तुम्हा माहित आहे का? नगरमध्ये केला जातो उत्साहात साजरा

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर शहरात बागुल पंडुगू सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील तोफखाना...