spot_img
देशOdisha Accident News : देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात; ८ ठार ७...

Odisha Accident News : देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात; ८ ठार ७ गंभीर

spot_img

नगर सह्याद्री टीम :
Odisha Accident News : अपघातांची मालिका सुरूच आहे. अपघाताच्या दुर्घटना संपण्याचे नाव घेत नाही. आता आणखी एक मोठे वृत्त आले आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या वाहनाला भीषण अपघात झाला.

यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले. हा अपघात ओडिशात केंदुझार जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 20 वर बालीजोडी आज सकाळी (दि.१) झाला. हे सर्व लोक पोदामारी गावातील होते.

अधिक माहिती अशी : पोदामारी गावातील 20 जण माँ तारिणी देवीच्या दर्शनासाठी व्हॅनमधून निघाले होते. वेगात असणाऱ्या वाहनाने उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की, ७ जणांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सकाळी दाट धुकं असल्याने वाहन चालकाला ट्रक दिसला नसावा असा प्राथमिक अंदाज आहे.

अपघातात जखमी असलेल्या सर्वांना घटगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात ८ लोक गंभीर जखमी असल्याचे समजते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

द्राक्षाचा गोडवा वाढला! कीलोला किती रुपयांचा दर?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव,घारगाव ,कोळगाव, वडळी, आढळगाव, कोकणगाव, हिरडगाव, बेलवंडी कोठार,...

वेश्या व्यवसाय करणाऱ्या प्रियसीला संपवलं; रेड लाईट परिसरात प्रियकराच भयंकर कृत्य!

मुंबई । नगर सहयाद्री चारित्र्यावर संशय घेत प्रियकरानं वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या महिलेची हत्या...

रखरखत्या उन्हात पडणार रिमझिम धारा, हवामानात होणार बदल!

मुंबई । नगर । सहयाद्री:- देशभरात सध्या हवामानामध्ये सतत बदल होत असून, तापमानाचा अंदाज...

कोतवाली पोलिसांची कामगिरी; ५ वर्षांची हरवलेली चिमुकली ४० मिनिटात सापडली..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- १४ मार्च रोजी सकाळी दहा वाजता, केडगाव परिसरातील रोशन कुमार...